पीएम्इंडिया
आदरणीय राष्ट्रपतीजी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, उपस्थित सर्व वरिष्ठ मान्यवर. मी आदरणीय राष्ट्रपतीजींचा फार आभारी आहे की, त्यांनी या व्यवस्थेत प्राण फुंकले. अन्यथा येणे-जाणे, भेटणे, काही इकडचे-तिकडचे असे आणि मग निरोप ही प्रथा चालतच राहणार काळाच्या गरजेनूसार त्यात सहभाग, समन्वय यावर अधिक भर देण्यात आला. ही जी व्यवस्था विकसित झाली आहे आणि यातील मंथनातून जे अमृत प्राप्त झाले आहे ते भविष्यात देशाच्या विकास यात्रेसाठी दिशादर्शक ठरेल. यात ज्ञान आणि अनुभव यांचे सामर्थ्य जोडल्यास आणि निश्चित कालमर्यादेत परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रयत्नांवर भर देण्यात येईल. मी नेहमी विचार करतो की, प्राथमिक शिक्षण व्यक्तीच्या आयुष्यात फार मोठी भूमिका निभावते. प्राथमिक शिक्षण व्यक्तीला आपल्या मुळांशी घट्ट बांधून ठेवते. पण उच्च शिक्षणामुळे गगनभरारी घेण्याचे वेध लागतात आणि म्हणून जेवढे महत्व प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्य घडवण्याचे आहे, प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून मुळांशी घट्ट जोडले जाते, तेवढीच उच्च शिक्षणाच्या माध्यमातून गगनभरारीची आकांक्षा कशी जागवता येईल. जर प्राथमिक शिक्षण जर व्यक्तीच्या जडणघडणीवर लक्ष केंद्रीत करत असेल तर उच्च शिक्षण देशाच्या जडणघडणीचा आधार बनते.
देश कशाप्रकारे सामर्थ्यवान होईल, त्याचा एक निश्चित आराखडा, त्याची एक ब्ल्यु प्रिंट याकाळात तयार होते आणि त्याअर्थाने तुम्हा लोकांचे योगदान, तुमच्या संस्थांचे योगदान, देशाच्या विकासयात्रेत, राष्ट्रनिर्मितीसाठी काळानुरूप ज्या प्रयत्नांची आवश्यकता आहे त्यांना जोडण्याच्या कामी येते. कदाचित यापूर्वीचे कोणतेच शतक असे नसेल ज्यावर तंत्रज्ञानाचा एवढा प्रभाव राहिला असेल. एक प्रकारे पूर्ण समाजजीवन तंत्रज्ञान आधारित झाले आहे आणि तेव्हा आमच्यासाठी हे गरजेचे आहे की तंत्रज्ञानाची ही महती स्वीकारतांना, भविष्यकाळ नजरेसमोर ठेवून आम्ही स्वस्त, सर्वांना परवडेल अशा तंत्रज्ञानाच्या दिशेने कसे मार्गक्रमण करु? आम्ही शाश्वत तंत्रज्ञानावर कशाप्रकारे जोर देऊ आणि हे करावयाचे असेल तर आम्हाला नावीन्यपूर्ण कल्पनांवर भर दिला पाहिजे. त्यासाठी लाखो आव्हाने आहेत. पण, जसे आता सांगण्यात आले की, त्यासाठी लाखो लोक सुद्धा आहेत. परंतु जोपर्यंत ही मने नवकल्पनांसाठी जोडत नाहीत ते जर फक्त उपभोक्ताच राहतील तर मी समजतो की या सर्व मेंदूचा खुराक पाहिजे तोही आम्ही देऊ शकणार नाही आणि म्हणून आम्ही सुदैवी आहोत की आमच्या जवळ लाखो, करोडो मने आहेत. पण जोपर्यंत आम्ही नवकल्पनांसाठी अनुकूल वातावरण तयार करत नाहीत, कार्यप्रणाली विकसित करत नाहीत. स्रोतांचा योग्य वापर करत नाही, तर कधी-कधी विचार तसेच राहतात. म्हणून स्वप्न साकार करण्याचा एक मार्ग आहे, तो म्हणजे नवकल्पनांना. आमच्या संस्था नवकल्पनांना प्राथमिकता देण्यात किती सफल होत आहेत.
आज जागतिक हवामानबदल, पर्यावरण या सर्व मुद्यांची जगभर चर्चा होत आहे. काही लोकांसाठी जागतिक हवामानबदल चिंतेचा विषय आहे, तर काही लोकांसाठी जागतिक हवामानबदल हे बाजारपेठेचे एक कारण ठरत आहे. त्यातील काही लोकांनी याला बाजारपेठेतील संधी असे रुपांतरीत करण्याचे ठरवले आहे. त्यांची इच्छा आहे की, आम्ही तंत्रज्ञानामध्ये नवनवीन बदल करावे जेणेकरुन जागतिक हवामानबदलाच्या नावाखाली जगाची बाजारपेठ हस्तगत करता येईल. भारतासारख्या देशासाठी हे गरजेचे आहे की, आम्ही भविष्यातील पिढ्यांच्या रक्षणासाठी कोणत्या नवकल्पना जगासमोर मांडू शकू ? ज्या चांगल्या असतील आणि स्वस्त असतील आणि सामान्य व्यक्तीच्या आयुष्याशी सहजरित्या अनुरूप होतील. जर आम्ही ही व्यवस्था विकसित करु तेव्हा तर हे लाखो, लाखो लोक एक पाऊल टाकूनसुद्धा हवामानबदलाच्या एवढ्या मोठ्या समस्येवर सहज तोडगा काढतील.
आज जगात एक संस्कृती विकसित झाली आहे- थ्रो अवे कल्चर. परंतु, जगात जे संकट निर्माण झाले आहे, त्याच्यामुळे आता थ्रो अवे कल्चर चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे पुनर्वापर कसा करता येईल, रिसायकल कसे करता येईल यावर मंथन सुरू आहे. भारतासारखा एवढा विशाल देश, आम्ही टाकाऊपासून संपत्ती (टिकावू) करण्यासाठी काय नवकल्पना निर्माण करु शकतो. समजा आम्हाला 50 दशलक्ष घरांची बांधणी करावयाची आहे. आज ज्या सामग्रीच्या आधारावर घर बांधणी करत आहोत काय ? आम्ही एवढी घरे बांधण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात सामग्री पुरवू शकू का ? आम्हाला माहित आहे, सध्या वाळूची तस्करी होत आहे. एक राज्य दुसऱ्या राज्यात तस्करी करत आहे कारण त्यांच्याकडे बांधकामासाठी वाळू उपलब्ध नाही. पर्यावरणाचीही काही कारणे अशी आहेत ज्यामुळे वाळू मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा आमच्या नवकल्पनांना सर्वात मोठे आव्हान आहे की, आम्ही घरांची बांधणी कोणत्या साधनसामग्रीवर करावी. जे आमच्याकडे कचरारुपाने पडले आहे तेच चांगल्या निर्मितीचे कारण ठरेल. आम्ही नवकल्पना कशा आणू. आम्ही कधी कधी बाहेरच्या किंवा उधारीच्या वस्तुंना पटकन स्वीकारतो. ज्याठिकाणी मोठ्या मुश्किलीने आठवड्यातून एकदा सुर्यदर्शन होते त्याठिकाणी जेव्हा घराची बांधणी करायची असेल तर चोहोबाजूंनी काच लावावी लागेल. कारण कोठेतरी सुर्यकिरण टिकतील, म्हणजे आम्हाला आमच्या गरजेनुरुप आमचे स्थापत्यशास्त्र विकसित करावे लागेल. जोपर्यंत आम्ही आमच्या गरजेनुरुप स्थापत्यशास्त्र विकसित करत नाही तोपर्यंत उधारीची व्यवस्था स्वीकारीत राहू. म्हणजेच आम्ही संकटाला आमंत्रण देत आहोत. आणि म्हणूनच विज्ञान हे जरी वैश्विक असले तरी तंत्रज्ञान स्थानिकच असले पाहिजे, हे जोपर्यंत आम्ही हे लागू करत नाही, आता समजा मला आसाममधील पाणी काढावयाचे आहे वा पाणी पोहचवायचे आहे तर मी 50 वेळा विचार करेन की मला स्टीलचा पाईप हवा आहे का, जर माझे उत्तर असेल की स्टील पाईपशिवाय बांबूला पाईपसारखे परिवर्तीत करुन पाणी पोहचवले जाऊ शकते आणि स्टीलचे आयुष्य जास्त असते. तात्पर्य हे की, मला त्याठिकाणी बांबू उपयोगी पडेल तर स्टील घेऊन जाण्यात काय अर्थ आहे आणि म्हणून समाजजीवनाच्या ज्या नैसर्गिक गरजा असतात, त्यांचा आम्ही कशाप्रकारे योग्य वापर करु. आम्ही एक आभासी मंच तयार करु शकू का, काय एक वेब स्वाक्षरीकृत प्रिंट आमच्यासमोर आली आहे. आम्ही एक असा आभासी मंच तयार करु, ज्याचे जागतिक पातळीवर सहज प्रयोग होत आहेत. त्यांना आम्ही निमंत्रण पाठवू. आम्ही त्याच्यावर परिसंवाद घडवून आणू, चर्चा करू, त्यातून कदाचित काही गोष्टी आमच्यासाठी लाभदायक ठरतील. आम्हाला काहीतरी निर्माण करण्याची प्रेरणा देतील. आम्हाला याचा उपयोग करता येईल का ? जर आम्ही अशाप्रकारच्या व्यक्तींशी जोडले गेलो तर अधिक प्रयत्न करुन यशस्वी होता येईल. आमच्या संस्था आज आम्हाला माहिती आहे, जे आमच्याकडे विद्यार्थी येतात, ते कशाप्रकारे येतात. एक चिंतेची बाब म्हणजे, मोठ्या संख्येने विद्यार्थी आमच्याकडे येतात ते प्रवेश परीक्षा कशी उत्तीर्ण करावयची यात त्यांचा हातखंडा असतो. ते अशाप्रकारच्या शिकवण्यांचीही हजेरी लावतात. जे तुम्हाला परीक्षेत उत्तीर्ण करायचा मार्ग दाखवतात त्यामुळे आम्हाला त्यांची खरी प्रतिभा आणि क्षमता समजत नाही. ते प्रवेश घेतात आणि त्यांना माहित आहे की आमचा पाया असा आहे की पाईपलाईनच्या या टोकाकडून प्रवेश केला तर दुसऱ्या टोकातून बाहेर निघतोच निघतो. दुसरा कोणताही मार्ग नाही. आमच्याकडे एखादा प्रशासन सेवेतील अधिकारी 24 तास अभ्यास करुन आला असेल तर तो तिकडे सचिव म्हणूनच बाहेर निघणार. ही जी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही सातत्याने श्रेणी पध्दत (रँकींग) बदलू शकू का ? अन्यथा आम्ही गुंतवणूक करत राहू, मी हे समाजाबद्दल सांगत आहे, सरकारबद्दल नाही. आम्ही गुंतवणूक करत राहू पण अंतिम उत्पादन जे आहे ते आमच्या कामी येत नसेल तर त्याची गुजरण आम्ही करु. परंतु तो स्वतः शिक्षक बनून गुजरण करेल. आपला देश सध्या मोठया प्रमाणात संरक्षण सामुग्री आयात करतो. संरक्षण क्षेत्रासाठी देशाचा बराचसा पैसा वापरला जातो. संरक्षण साधनसामुगी उत्पादनासाठी संसाधन जुळवाजुळवीची सर्वात मोठी ताकद आहे. कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि यात माझ्या देशाच्या तंत्रसंस्था त्या संशोधनात अग्रेसर नाही राहू शकत ? या मनुष्यबळाची क्षमता एवढी हवी की संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रातल्या लोकांचे लक्ष वेधले गेले पाहिजे की सर्वोत्कृष्ट कौशल्य येथे आहे. उत्पादन मी करेन आणि मला वाजवी दरात कौशल्यप्राप्त मनुष्यबळ मिळत असेल तर परवडणारे दर घेऊन जागतिक बाजारपेठेत उभे राहता येईल. मी बाजारपेठेत उभा राहीन याचा अर्थ असा की माझ्या देशाच्या संरक्षण आवश्यकतेसाठी मी इतकी आयात करतो तर माझ्या या संरक्षण संस्थांनी सर्वांनी मिळून निश्चित करावे ही दहा वर्षात देशाची संरक्षण साधनसामुग्रीची आयात 50 टक्क्यांनी कमी करु. देशाचा केवढा मोठा फायदा होईल. आपण स्वयंपूर्ण होऊ.
आज सौर ऊर्जेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 175 गिगावॅट फारच महत्वाकांक्षी योजना आहे. जगातील कोणत्याही देशातील व्यक्तीसोबत भारत 175 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेची चर्चा करतो, तेव्हा पहिली पाच मिनिटे त्याला वाटते की मेगावॅट की गिगावॅट म्हणत आहे. त्यांना आश्चर्य होत आहे की, एखादा देश एवढा मोठा पुढाकार कसा घेऊ शकतो ? पण जर आम्ही तंत्रज्ञानाला नवकल्पनांची जोड दिली तर सौर उत्पादनांमध्ये सौर उपकरणांच्या निर्मितीसाठी आम्ही नवकल्पना वापरून कमाल ऊर्जा उत्पादनाच्या दिशेने कसे जाऊ शकू, आम्ही याला अधिक स्वस्त कसे बनवू, आम्ही किती मोठ्या देशाची सेवा करु शकू?
आता मी एक विज्ञानविषयक पत्रिका पाहत होतो. मला काही जास्त वाचता येत नाही मात्र त्यातील एक बाब माझ्या लक्षात आली. एक प्रयोग सुरू आहे, पवन ऊर्जेसंबंधी. पवनचक्क्या आहेत, त्या हवेतील आर्द्रता शोषून घेऊ शकतात. वाऱ्यामुळे ऊर्जा निर्माण होईल, पण त्याच प्रणालीत त्या आर्द्रता शोषून त्याला पाण्यात रुपांतरीत करता आले तर एक पवनचक्की 24 तासात 10,000 लीटर गोडेपाणी निर्माण करु शकते. याचा अर्थ असा की, समजा वाळवंटातील गावात आम्ही अशाप्रकारच्या पवनचक्क्या लावल्या, वाऱ्याचा वेग आहे आणि जर मी 10,000 लिटर गोडे पाणी देत असेल याचा तर अर्थात आरोग्यविषयक सर्व समस्यांचे निदान करता येऊ शकेल. जगातील कोणत्याही देशात गेले तर अशाप्रकारचा पराक्रम करु शकतील. काय आम्ही त्यांना भारतात ही संधी उपलब्ध करुन देऊ शकू?
आमच्या सर्व संस्था, त्या आपल्या अंतर्गत संस्थांना कशाप्रकारे विकसित करतील आणि उद्योग जगताला कशाप्रकारे भागीदारी दिली जाईल? जेणेकरुन उद्योग जगताच्या ज्या गरजा आहेत, ज्या व्यवसायासाठी लागणार आहेत, जर शिक्षण संस्थेअंतर्गत संस्था विकसित झाल्या तर त्यांच्यामध्ये समन्वय प्रस्थापित होईल आणि मला वाटते की आम्ही नवनवीन संशोधनासाठी व्यावसायिक क्षेत्रात जलदरित्या जाण्याचा निर्णय घेऊ आणि एकमेकांना शक्ती प्रदान करू.
आम्ही “मेक इन इंडिया” विषयी बोलतो. “मेक इन इंडियाचे” सर्वात मोठे बलस्थान काय आहे? कच्चा माल आमच्याकडे असल्याचा दावा आम्ही करु शकत नाही. पण आमच्याजवळ मानवी भांडवल एवढे मजबूत आहे की तो आमचा पाया आहे, मेक इन इंडियासाठी जगासमोर आम्ही दावा करु शकतो आणि त्यासाठी कौशल्य विकास पाहिजे. आम्ही ज्या विषयांवर काम करु, समजा माझे पेट्रोलियम विद्यापीठ आहे. गॅसवर आधारित अर्थव्यवस्थेच्या दिशेने माझा देश वाटचाल करत आहे तर मला छोट्या गावातील गॅससंबंधी जे तंत्रज्ञान, दुरुस्ती, पाईप दुरुस्ती, सुरक्षा मानके, यासाठी छोट्या-छोट्या कामगारांची आवश्यकता भासेल. आमच्या संस्था शेवटच्या टोकापर्यंत आम्हाला कशाप्रकारे मनुष्यबळ विकास हवा आहे त्याचा अभ्यासक्रम तयार करुन कौशल्य विकास करणाऱ्या संस्थांना त्यांच्यासोबत जोडतील, तर माझे विद्यापीठ तज्ज्ञ व्यक्तींना तयार करेल, निष्णात शास्त्रज्ञांना तयार करेल, तंत्रज्ञ तयार करतील. परंतु पाठबळासाठी मला ज्याप्रकारच्या मनुष्यबळाची आवश्यकता असेल तेही पर्यायी व्यवस्था म्हणून तयार असेल. किती मोठे परिवर्तन घडू शकते, पण आमचे काम तुकड्यांमध्ये होते. जोपर्यंत आम्ही समग्र दृष्टीकोन अंगीकारणार नाही, तेव्हा या तुकड्यांपासून जी व्यवस्था बनते त्यामुळे आमच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होते आणि म्हणून आमच्यासाठी हेही आवश्यक आहे. ज्याप्रकारे कोणताही देश विभक्तपणे चालू शकत नाही, त्याचप्रकारे कोणतीही संस्था एकटेपणे चालू शकत नाही. आमच्यासाठी आवश्यक आहे की, जग कोठे चालले आहे, त्या जगात आम्ही कोठे जाऊ शकतो, त्याजागी पोहचण्यासाठी आमच्याकडे काय साधने आहेत, आमचे स्रोत काय आहेत, आमची क्षमता काय आहे. आम्ही पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून, दशवार्षिक योजनांच्या माध्यमातून या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करु, आम्ही इथपर्यंत पोहचू, तेव्हा कुठे हे शक्य होईल. अन्यथा मला आठवते, मी जेव्हा नव्यानेच गुजरातचा मुख्यमंत्री झालो होतो, तेव्हा माझे लक्ष आयटीआय जे तंत्रज्ञानाच्या विश्वाचे शिशुमंदिर आहे. बाल मंदीर म्हणता येईल. मी त्यावर लक्ष केंद्रीत केले, तेंव्हा मी परेशान झालो. त्याठिकाणी जे ऑटोमोबाईलचे अभ्यासक्रम होते, असे अभ्यासक्रम होते, की ज्या गाड्या अस्तित्वातच नाहीत, त्याविषयीचा अभ्यासक्रम होता. परंतु, आमचा विद्यार्थी बिचारा प्रवेश घेऊन एक वर्ष या बाबींचा अभ्यास करतो. म्हणजे आम्हाला हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी तुम्ही ज्याठिकाणी आहात तेथून मागे काय होऊ शकते, तुम्ही फार मोठे योगदान देऊ शकता.
या छपाईच्या माध्यमातून तुम्ही फार मोठे योगदान देऊ शकता. म्हणून आम्ही एक नवी दृष्टी घेऊन, दूरदृष्टीचा विचार करुन या बाबी कशा करता येतील आम्ही भाग्यवान आहोत कारण आमचे राष्ट्रपती स्वतः चालते फिरते विद्यापीठ आहेत. कोणी मला विचारले की, पंतप्रधानपदाचा काय फायदा आहे, तर मी म्हणेन की सर्वात मोठा फायदा आहे की, राष्ट्रपतींच्या जवळ जाता येते. जेव्हा भेटतो, तेव्हा ज्ञानाचे भांडार असते. मी हे सत्य सांगत आहे. ते एवढ्या बारकाईने सर्व बाबी सांगतात, त्यासोबत त्यांचा अनुभव जोडलेला आहे. तुम्हाला तर त्यांचे मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला काम करावयाचे आहे. मला वाटत नाही की, आता आम्हाला कोणी रोखू शकेल. आकांक्षा पुढती गगन ठेंगणे (स्काय इज दी लिमिट), आता राष्ट्रपतींच्या आदेशानुसार, त्यांच्या इच्छेनुसार तुम्हाला काही बाबी कराव्या लागतील, मला वाटते की, यामुळे देशाचा लाभ होईल. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. मी राष्ट्रपतीजींचा फार आभारी आहे कारण त्यांनी मला तुमच्यामध्ये येण्याची संधी दिली. फार फार धन्यवाद.
S.Thakur/S.Tupe/B.Gokhale
Am grateful to @RashtrapatiBhvn for filling life into this system: PM at Visitors' Conference in Rashtrapati Bhavan https://t.co/pLfu5kwkgA
— PMO India (@PMOIndia) November 5, 2015
Society is becoming technology driven. It is essential to understand the importance of this & look towards affordable technology: PM
— PMO India (@PMOIndia) November 5, 2015
To achieve one's dreams, innovation is the key. Our institutions must place their focus on innovation: PM https://t.co/pLfu5kwkgA
— PMO India (@PMOIndia) November 5, 2015
Science is universal but technology has to be local: PM @narendramodi https://t.co/pLfu5kwkgA
— PMO India (@PMOIndia) November 5, 2015
Our initiative on solar energy has surprised many but if we are doing innovation in technology and energy, it can be a big service: PM
— PMO India (@PMOIndia) November 5, 2015
The biggest strength of #makeinindia is human capital. Skill development is extremely vital: PM @narendramodi @makeinindia
— PMO India (@PMOIndia) November 5, 2015
Our President is a walking talking university. He is an ocean of knowledge: PM @narendramodi @RashtrapatiBhvn https://t.co/pLfu5kwkgA
— PMO India (@PMOIndia) November 5, 2015
At the Visitors' Conference at Rashtrapati Bhavan, highlighted the vitality of innovation & technology in the development of the nation.
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2015
Greater industry-academia partnerships will give a boost to research, learning & will benefit the youth. https://t.co/ehnGj2oLEp
— NarendraModi(@narendramodi) November 5, 2015