पीएम्इंडिया
अध्यक्ष ओबामा,
प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी,
न्यूयॉर्कमध्ये अध्यक्ष ओबामा यांना भेटून फार आनंद झाला. ही बैठक आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार.
तुमची मैत्री आणि दूरदृष्टी तसेच दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांप्रती असलेली तुमची कटीबद्धता यांचा मी मनापासून आदर करतो.
आपण द्वीपक्षीय सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीत चांगली प्रगती केली आहे.
आठवड्याच्या शेवटी मी सिलिकॉन व्हॅलीमध्ये होतो. त्यावेळी अमेरिकेच्या यशाचा पाया असलेल्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि उद्योजकता यांची शक्ती मी अनुभवली.
याचवेळी मी आपल्या संबंधांमधील महत्वाचा दुवा असलेली- तरुणाई, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण कल्पनाही अनुभवली. तसेच मानवी प्रगतीसाठी भारत व अमेरिकेची असलेली नैसर्गिक भागीदारीही अनुभवली.
कॅलिफोर्नियात मला भारत व अमेरिका हे आशिया प्रशांत समुहाच्या गतिशीलतेचे घटक असल्याची आठवण झाली.
सध्या जगाला भेडसावत असणाऱ्या समस्या आणि जागतिक आव्हाने पाहता, आपली भागीदारी ही आपल्यासाठी व जगासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
शाश्वत विकासाची उद्दिष्टे, ज्यात हवामानबदलाविरोधातील लढाई आणि निसर्गाचे संवर्धन यांचा समावेश आहे ते साध्य करण्यासाठी आपल्याला नवनवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे.
अध्यक्ष व मी हवामानबदलाच्या मुद्यावर कोणत्याही तडजोडीला तयार नाहीत, सोबतच मानवतेच्या आकांक्षापूर्तीसाठी आम्ही आमचे पूर्ण सामर्थ्य वापरु. आम्ही दोघांनीही महत्वाकांक्षी अशी राष्ट्रीय उद्दिष्टे निश्चित केली आहेत.
भारतासाठी, 2022 पर्यंत आम्ही केवळ 175 मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा विकसित करणार नाहीत, तर विकासाची अशी रणनिती आखणार आहोत की, ज्यात आम्हाला जास्तीत जास्त शाश्वत ऊर्जेचा वापर करायला मिळेल. आमची संस्कृती आणि परंपरा लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेतला आहे, तसेच यातून आमची वसुंधरेच्या भवितव्याप्रती असलेली कटीबद्धता दिसून येते.
आमची ऊर्जा क्षेत्रात असलेली असामान्य अशी द्वीपक्षीय भागीदारी स्वच्छ, नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा तत्परता यावर केंद्रीत आहे.
मी अध्यक्ष ओबामांचे आभार मानतो की, त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन परवडण्याजोगे स्वच्छ ऊर्जेचे स्रोत जे जगाला स्वच्छ ऊर्जा देतील ते जागतिक जन- भागीदारीतून विकसित करण्याचे मान्य केले आहे.
हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्हाला एकत्रितपणे काम करावे लागेल. आणि यासोबतच हे महत्वाचे आहे की परवडण्याजोगे स्रोत ज्यांना सर्वाधिक गरज आहे त्यांना सहज उपलब्ध होतील ते पाहणे.
पॅरिसमध्ये हवामानबदलाबाबत काय ठोस निर्णय घेतला जातो, याकडे आमचे लक्ष असणार आहे. ज्यात गरीब राष्ट्रांना व लहान द्वीप राष्ट्रांना आर्थिक, तांत्रिक मदत पुरवण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुधारित सुरक्षा परिषदेमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या मागणीला अमेरिकेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी अध्यक्ष ओबामांचे आभार मानतो. एका निश्चित कालमर्यादेत सुधारणा प्रक्रिया पूर्ण व्हावी, या मुद्यावरही आम्हाला अमेरिकेचा पाठिंबा हवा आहे.
आंतरराष्ट्रीय निर्यात नियंत्रण राजवटीमध्ये भारताला निश्चित कालमर्यादेत सभासदत्व देण्याबाबत अमेरिकेच्या नियमित पाठिंब्याबद्दल मी अमेरिकेची प्रशंसा करतो.
आमची भागीदारी महत्त्वाच्या विषयांशी संबंधित आणि सुरक्षेची चिंता यावर भर देते.
आमचे संरक्षण सहकार्य, ज्यात संरक्षण व्यापार व प्रशिक्षणाचा समावेश आहे ते विस्तारत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या दहशतवादाचा वाढता धोका आणि नव्या दहशतवादाचा उदय याचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सायबर सुरक्षेविषयी नुकतीय यशस्वी बैठक झाली.
अफगाणी नागरिकांना दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आणि शांततामय, स्थिर आणि भरभराटीच्या भविष्यकाळासाठी सहकार्य करण्याविषयी आमचे एकमत झाले आहे.
आशिया, प्रशांत समुह आणि भारतीय महाद्वीप यात जपानसारख्या स्थानिक भागीदारांना समाविष्ट करुन आमचा संयुक्त व्युहात्मक दृष्टीकोन वाढवण्याच्या प्रगतीचे मी स्वागत केले. यामुळे आमचे सागरी सुरक्षेतील सहकार्यही बळकट होणार आहे.
या क्षेत्रात आमचा सहभाग वाढवण्यासाठी मी भारताच्या आशिया पॅसिफिक आर्थिक समुदायामध्ये जलद सभासदत्वासाठी अमेरिकेसोबत काम करण्यास उत्सुक आहे.
आमची आर्थिक भागीदारी ही आमच्या संबंधातील महत्वाचा घटक आहे. न्यूयॉर्क व सॅन होजेमध्ये उद्योगजगताच्या प्रमुखांसोबत माझ्या चांगल्या बैठका झाल्या आहेत. भारताप्रतीचा त्यांचा आत्मविश्वास पाहून मला आनंद झाला, आमच्यासाठी त्यांचा विधायक अभिप्राय आणि सूचना महत्त्वाच्या आहेत.
आम्ही नियमितपणे आर्थिक सहकार्याविषयीचा द्वीपक्षीय आराखडा, ज्यात द्वीपक्षीय गुंतवणूक करार आणि पूर्ण सहकार्य यावर असेच एकत्रितपणे काम करत राहू.
ही बैठक आणि माझ्या अमेरिकेतील विविध मुलाखती हे आमच्या संबंधांमध्ये असलेली अद्वितीय खोली आणि वैविध्य दर्शवते.
आमच्या व्यापक अशा भागीदारीसाठी, तातडीच्या प्राधान्य मुद्यांवर वेगाने पुढे जाण्यासाठी आजची आमची बैठक अतिशय फलदायी ठरली.
धन्यवाद.
S.Thakur/M.Desai
I thanked President Obama for U.S. support for India's permanent membership of a reformed UN Security Council: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 28, 2015
Our partnership addresses a broad range of strategic and security concerns: PM @narendramodi https://t.co/tv6LVAraUe
— PMO India (@PMOIndia) September 28, 2015
My meeting with @POTUS focussed on advancing some of our immediate priorities & our broader strategic partnership. pic.twitter.com/H3CkoEzvEH
— NarendraModi(@narendramodi) September 28, 2015
During the meeting, @POTUS & I discussed trade, climate change, energy & defence cooperation. http://t.co/oeg59d4Ct2 @WhiteHouse
— NarendraModi(@narendramodi) September 28, 2015