Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली


 

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री  मार्को रुबियो यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

परराष्ट्रमंत्री रुबियो यांनी पंतप्रधानांना संरक्षण, सामरिक तंत्रज्ञान, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा, कनेक्टिव्हिटी, शिक्षण आणि लोकांमधील संबंध यासह विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यातील सातत्यपूर्ण प्रगतीबाबत माहिती दिली.

परराष्ट्रमंत्री रुबियो यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर अमेरिकेचा दृष्टिकोन सामायिक केला.

पंतप्रधानांनी शांतता प्रयत्नांना भारताच्या सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आणि संवाद व मुत्सद्दीगिरीद्वारे संघर्षांवर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले.

पंतप्रधानांनी परराष्ट्रमंत्री रुबियो यांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यापर्यंत आपल्या शुभेच्छा पोहचवण्यास सांगितले आणि त्यांच्याबरोबर निरंतर  संवाद साधण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

***

शैलेश पाटील/सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai