पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अश्गाबात कराराला भारताने रुकार द्यावा यासाठी मंजुरी देण्यात आली. अश्गाबात करार हा आंतरराष्ट्रीय वाहतूक तसेच मध्य आशिया व पर्शियन आखातामधील माल वाहतूक सुलभ व्हावी यासाठी करण्यात आला आहे.
या कराराचे ओमान, इराण, तुर्कमेनिस्तान व उझबेकिस्तान हे देश संस्थापक सदस्य आहेत. आता कझाकिस्तान हा देश देखील या करारात सहभागी झाला आहे. या करारामुळे भारत या मार्गाचा उपयोग युरो-एशियन क्षेत्रासोबत व्यापार व व्यावसायिक संवाद वाढविण्यासाठी करू शकतो. याशिवाय, संपर्क वाढविण्यासाठी आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉरच्या अंमलबजावणीच्या आपल्या प्रयत्नांना याची जोड मिळेल.
अश्गाबात करार स्वीकारण्याचा आपला निर्णय भारत आता डिपॉझिटरी देश तुर्कमेनिस्तानला कळवेल. संस्थापक सदस्यांच्या संमतीनंतर भारत या कराराचा एक घटक बनेल.
S. Phophale / S.Tupe / M. Desai