पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरबँक स्थानिक चलन कर्ज करार आणि ब्रिक्स आंतरबँक सहकार्य प्रणाली अंतर्गत ईडीआयएम बॅंकेद्वारा पत मानांकनाशी संबंधित सहकार्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे. हे दोन्ही करार अम्ब्रेला करार असल्यामुळे त्यांचे स्वरूप बंधनकारक नाही . एक्सिम बँकेच्या संचालक मंडळाला त्यांच्या कक्षेत वैयक्तिक करार आणि कटिबध्दतेशी संबंधी वाटाघाटी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
प्रभाव
हे करार परस्पर हिताच्या बहुपक्षीय संवादाला प्रोत्साहन देतील, ज्यामुळे ब्रिक्स देशांबरोबर राजकीय आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होतील.
करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर एक्सिम बँकेला सीडीएस, विईबी आणि बीएनडीईएस यासारख्या मोठ्या वित्त संस्थांबरोबर आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होईल. एक्सिम बँक योग्य वेळी या करारांचा वापर करून आपल्या व्यवसायासाठी निधी उभारण्यासाठी या सदस्य संस्थांपैकी कुणाही बरोबर द्विपक्षीय करार करू शकेल.
N.Sapre/S.Kane/P.Kor