Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंध्रप्रदेशच्‍या ‘अमरावती’ या नव्‍या राजधानीच्‍या शहराच्‍या भूमीपूजनाप्रसंगी पंतप्रधानाचे भाषण

आंध्रप्रदेशच्‍या ‘अमरावती’  या नव्‍या राजधानीच्‍या शहराच्‍या भूमीपूजनाप्रसंगी  पंतप्रधानाचे  भाषण

आंध्रप्रदेशच्‍या ‘अमरावती’  या नव्‍या राजधानीच्‍या शहराच्‍या भूमीपूजनाप्रसंगी  पंतप्रधानाचे  भाषण

आंध्रप्रदेशच्‍या ‘अमरावती’  या नव्‍या राजधानीच्‍या शहराच्‍या भूमीपूजनाप्रसंगी  पंतप्रधानाचे  भाषण

आंध्रप्रदेशच्‍या ‘अमरावती’  या नव्‍या राजधानीच्‍या शहराच्‍या भूमीपूजनाप्रसंगी  पंतप्रधानाचे  भाषण

आंध्रप्रदेशच्‍या ‘अमरावती’  या नव्‍या राजधानीच्‍या शहराच्‍या भूमीपूजनाप्रसंगी  पंतप्रधानाचे  भाषण


विजयादशमीच्‍या या पवित्र दिवशी व नवरात्रीच्‍या पूजेनंतर आंध्रप्रदेश एक महत्‍वाचे पाऊल उचलत आहे. आज आंध्रप्रदेशची राजधानी जी अनेक वर्षापासून आपला एक सांस्‍कृतिक वारसा सांभाळत आहे, एक ऐतिहासिक वारसा जपत आहे, ती संस्‍कृती व ऐतिहासिक वारसा सोबत घेऊन अमरावती एका नव्‍या रंग-रूपात, आधुनिक थाटा-माटात आंध्रप्रदेशच्‍या अपेक्षांचा एक केंद्रबिंदू बनत आहे व खऱ्‍या अर्थाने लोकांची राजधानी बनत आहे. मी येथील सरकारचे व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो, त्‍यांना खूप-खूप शुभेच्‍छा देतो.

सरकार स्‍थापन झाल्‍यापासून इतक्या कमी वेळेत ज्‍या गतीने चंद्राबाबूंनी हे कार्य हातात घेतले व जगभरातील सर्वोत्कृष्ट गोष्टींना यामध्‍ये समाविष्‍ट करण्‍याचा जो प्रयत्‍न केला आहे, त्‍यासाठी मी चंद्राबाबूंचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो.

आपला देश स्‍वतंत्र झाल्‍यापासून खुपच कमी शहरे निर्माण झाली, त्‍यामुळे भारतामध्‍ये नवीन शहर निर्माण होणे, हा विषय ज्‍याप्रमाणात रूळायला हवा होता तितका रूळला नाही. दुर्भाग्याने काही दशकांपासून आपल्‍या देशामध्‍ये एक धारणा झाली आहे की, शहरीकरण एक समस्‍या आहे. आणि त्यामुळेच आपण या प्रगती केंद्राकडे दुर्लक्ष केले. शहरीकरणाला एक समस्‍या न मानता एक संधी म्‍हणून स्‍वीकारणे ही काळाची गरज आहे. म्‍हणून, जग ज्याप्रकारे बदलत आहे, ज्‍या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, त्याप्रमाणे आपल्‍यालासुद्धा एका आधुनिक शहराकडे वाटचाल करावी लागेल. म्हणूनच भारत सरकारने 100 स्‍मार्ट शहरे घडविण्‍याच्‍या दृष्‍टीने पाऊल उचलले आहे. ही शहरे आर्थिक घडामोडींचे केंद्र असावीत, आर्थिक विकासाची इंजिने बनावीत, याप्रकारे शहराची नव्‍याने रचना करण्‍याचा आमचा प्रयत्‍न असेल आणि तेव्हाच अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दळणवळण, वॉक टु वर्कची योजना, ग्रीन, कचराविहरित शहर इत्‍यादीचा समावेश असलेली आधुनिक शहरे बनतील.

देशात शहरी विकासाच्‍या दिशेने जे पाऊल उचलले जात आहेत, त्‍यामध्‍ये अमरावती, मागदर्शक म्‍हणून कार्य करेल, असा मला विश्‍वास आहे. आताच जपानचे मंत्री सांगत होते की, नवे शहर बनवणे किती कठीण असते, त्‍याचा जपानला पूरेपूर अनूभव आहे. जेव्हा 2001 मध्‍ये गुजरातमध्‍ये भयंकर भूकंप आला, तेव्‍हा असा प्रसंग माझ्या जीवनात सुद्धा आला. त्‍यानंतर माझ्यावर गुजरातच्‍या मुख्‍यमंत्रीपदाची जबाबदारी आली.

संपूर्ण कच्‍छ जिल्‍हा व इतर महत्‍वाची शहरे पूर्णपणे उद्धवस्‍त झालेली होती. आमच्‍या समोर त्‍या सर्व शहरांचे पुनर्वसन करण्‍याचे मोठे आव्‍हान होते. पण जेव्‍हा राजनितीची चक्रे फिरू लागतात, जनता-जनार्दनचे समर्थन असते, दृष्टिकोन स्‍पष्‍ट असतो, तेव्‍हा कार्य सिद्धीस जाते. आज तो जिल्हा, भारतातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्‍या जिल्‍हयांच्‍या स्‍थानी आहे.

जेव्‍हा मला अमरावतीचे हे निमंत्रण मिळाले, तेव्‍हा मी बाबूंना सांगितले मी जरूर येणार पण मी जेव्‍हा वर्तमानपत्रात असे वाचले की त्‍यांनी तेलंगणाच्‍या मुख्‍यमंत्र्याच्‍या घरी जाऊन निमंत्रण दिले, तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. या कार्यासाठी मी त्‍यांचे विशेषत्‍वाने अभिनंदन करतो.

काही लोकांच्‍या राजनैतिक स्‍वार्थापायी विचार-मंथनाची प्रक्रिया पूर्ण केल्‍याशिवाय घाई-घाईने आंध्र व तेलंगणाचे विभाजन झाले. पण या सा-या प्रक्रियेत ज्‍या निर्दोष लोकांना आपला जीव गमवावा लागला, संपत्तीचे अतोनात नुकसान झाले त्‍याचे दु:ख मला आजही आहे. इंग्रज मागे अशा काही गोष्‍ट सोडून गेले ज्‍यामुळे आपल्‍या देशात कधी कधी काहीना काही तणाव निर्माण होत असतो. मागील सरकार पण असे काही करून गेले, ज्‍यामुळे आंध्र व तेलंगणाच्या दरम्‍यान प्रत्‍येक वेळी काहीना काही तणाव असतोच. पण आता, आंध्र प्रदेश असो वा तेलंगणा असो, आमचा आत्‍मा तेलगू आहे व या तेलगु आत्‍माचे दोन बाहू आहेत, एक तेलंगणा व एक आंध्र, दोघांनी मिळून इतकी प्रगती करावी की ती भारताची शान वाढवण्‍यासाठी आमची शक्‍ती म्‍हणून उभी राहील.

भारत सरकारने जे स्‍टार्ट-अपचे अभियान चालवले आहे, त्‍या स्‍टार्ट-अपचा सर्वात जास्‍त फायदा घेण्‍याचे सामर्थ्य या भूमीमध्‍ये आहे, असा माझा विश्‍वास आहे. आंध्रच्‍या लाखो युवकांनी जगभरातील अनेक देशांमध्‍ये व्‍यावसायिकांच्‍या नात्‍याने आपले एक स्‍थान निर्माण केले आहे. आंध्रप्रदेश जवळ असे प्रतिभावान युवक, बुद्धिमान युवक, असावेत जे नाविन्‍यपुर्णतेसाठी,स्‍टार्ट-अपचे एक साम्राज्‍य आंध्रच्‍या भूमीवर निर्माण करू शकतात, मला विश्‍वास आहे की, या माध्‍यमातून आंध्र एका नव्‍या आर्थिक क्रांतीचे नेतृत्‍व करेल. ही क्रांती युवा केंद्रीत असेल तर देश नवी आर्थिक क्रांती घडवू शकतो व देशाला नवी आर्थिक शक्‍ती देऊ शकतो.

आंध्रप्रदेश व तेलंगणा जरी वेगळे झाले असले तरी दोघांमध्‍ये प्रगती करण्‍याची शक्‍ती आहे, दोन्‍ही एकमेकांना पूरक असून, एकत्र पुढे जाण्‍याचा जितका प्रयत्‍न ते करतील तितकाच या दोन प्रदेशांना लाभ मिळणार आहे.

जेव्‍हा अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान होते, तेव्‍हा तीन नवी राज्ये निर्माण झाली तीन राज्‍यांचे विभाजन झाले,पण कोणतेही कटुत्‍व आले नाही, कोणता संघर्ष, रक्‍तपात झाला नाही व त्‍यानंतर सुद्धा कोणते संकट सामोरे आले नाही. मला आंध्र व तेलंगणामध्ये तिच स्थिती आणण्‍याचा प्रयत्‍न करायचा आहे.

मागच्‍या सरकारने खूप अशा गोष्‍टी करून ठेवल्‍या, ज्‍या सुधारण्‍यात आमची बरीचशी शक्‍ती, वेळ जात आहे, पण मी या दोन्‍ही प्रदेशवासियांना हा विश्‍वास देऊ इच्छितो की, भारत सरकार सर्व प्रकारे आपल्‍या सोबत राहणार व शक्य ते सर्व सहकार्य करणार.

भारत सरकार व चंद्राबाबूंच्‍या कार्यशैलीमध्‍ये साधर्म्‍य असून एक-दुस-यांना समजून घेण्‍याची एक वृत्‍ती आहे. याचमुळे, सरकार बनल्‍यानंतर सर्वात आधी ज्‍यावर ध्‍यान दिले गेले, ते म्‍हणजे मानव संसाधन विकास. आंध्रमध्‍ये मानव संसाधनाच्‍या विकासाची एक राजधानी कशी बनेल, यावर आम्‍ही लक्ष केंद्रीत केले आहे. राज्‍यपुनर्रचना कायद्यानुसार मानव संसाधन विकासाला प्राधान्‍य देऊन आतापर्यंत 11 शैक्षणिक संस्‍थांचे कार्य पुढे नेले आहे. यामध्‍ये भारतीय तंत्रज्ञान संस्‍था, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्‍था, भारतीय व्‍यवस्‍थापन संस्‍था, अखिल भारतीय वैद्यक संस्‍था, राष्‍ट्रीय तंत्रज्ञान संस्‍था, भारतीय विज्ञान व शिक्षण संशोधन संस्‍था, केंद्रीय विद्यापीठ, पेट्रोलियम विद्यापीठ यांचा समावेश असून या सर्व संस्‍था इतक्या कमी वेळामध्‍ये उभारण्‍याच्या दिशेने महत्‍वपूर्ण पाऊले उचलली गेली आहेत. ही जनतेची राजधानी बनत असतांना तुम्‍ही लोकांनी आपल्‍या-आपल्‍या गावांमधून पवित्र माती व पाणी येथे आणले व ख-या अर्थाने या राजधानीला जनतेची राजधानी म्‍हणून बनविण्‍यासाठी जे यशस्‍वी आयोजन केले आहे, त्‍यामुळे या ठिकाणी येत असतांना माझ्या मनात पण एक विचार आला व मी सुद्धा माती व पाणी सोबत घेऊन आलो. मी भारताच्या लोकशाहीचे मंदिर असलेल्‍या – संसद परिसरातील माती व यमुना नदी जी केवळ एक नदी नसून एक संस्‍कृती आहे त्या नदीचे पाणी घेऊन आलो आहे. जेव्‍हा मी हे चंद्राबाबू नायडूंना दिले तेव्हा त्‍यांना आश्‍चर्य वाटले आणि ते मला सांगत होते की, हा माझ्या मनासाठी एक भावनिक स्‍पर्श आहे. पण, मी आंध्रवासियांना हे सांगू इच्छितो की, ही संसद परिसरातील माती व यमुना नदीचे पाणी इतकेच नव्‍हे तर एक प्रकारे देशाची राजधानी आता अमरावतीपर्यंत पोहचली,असा याचा संदेश आहे. हे या गोष्‍टीचे एक प्रतीक बनले आहे, या प्रतिकामध्‍ये अशी शक्‍ती आहे, जी दिल्‍ली आंध्रप्रदेशच्‍या विकास यात्रेमध्‍ये खांदयाला खांदा लावून चालणार, एकत्र राहून विकासाच्‍या नव्‍या उंची गाठणार, असा विश्‍वास निर्माण करते.

जे लोक आंध्र व तेलंगणाचे विभाजन करण्‍यासोबत, एक समस्‍येचे बीज रोवण्‍याचे, विष पेरण्‍याचे जे कार्य करत आहे, भ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत, युवकांच्‍या भावना भडकविण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत, मात्र मी आज अमरावतीच्‍या या सांस्‍कृतिक नगरीमधून समस्‍त आंध्रवासियांना असा विश्‍वास देऊ इच्छितो की, पुनर्रचना कायदयाअंतर्गत ज्‍या गोष्‍टी सांगितल्‍या गेल्‍या आहेत, त्या तंतोतंत पाळू. तो लागू करणार, हा विश्‍वास देण्‍यासाठी मी आलो आहे.

चंद्राबाबू आणि नरेंद्र मोदींची ही जोडी, ज्‍या गोष्‍टी ठरल्‍या आहेत, त्‍या वेळेच्‍या आत साकार करणार, व आंध्रचे स्‍वप्‍न पुर्ण करणार. माझ्या सोबत म्हणा, घोषणा द्या भारत माता की जय, भारत माता की जय, खूप-खूप धन्‍यवाद !

D. Wankhede/S.Tupe/N.Sapre