Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्रप्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातील दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांप्रति पंतप्रधानांनी संवेदना व्यक्त केल्या असून जखमींना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. तर जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की;

आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यात झालेला अपघात अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपले  प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रति मी संवेदना व्यक्त करतो तसेच जखमींना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना करतो.

पीएमएनआरएफमधूनन प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. तर जखमींना 50,000 रुपये दिले जातील: PM @narendramodi”

***

Nehakulkarni / ManjiriGanoo / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai