Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी अन्य मागास वर्गीयांच्या केंद्रीय सूचीतील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडून मिळालेल्या सल्ल्यानुसार आंध्र प्रदेश आणि नवीन स्थापना झालेले राज्य तेलंगण यांना लागू करण्यात येणाऱ्या अन्य मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीमध्ये जाती-जमातींचा समावेश/बदल/वगळणे आदींच्या माध्यमातून सुधारणा करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने आंध्र प्रदेशाच्या सूचीमध्ये एकूण 35 बदल तर तेलंगणाच्या सूचीमध्ये 86 नवीन जातींचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. या बदलांमुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील या जाती जमातींमधील लोकांना सरकारी सेवा आणि पदे तसेच केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळेल. केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना, शिष्यवृत्ती वगैरेंचा लाभ मिळण्यासाठी ते पात्र ठरतील, जे सध्या अन्य मागासवर्गीय व्यक्तींना मिळत आहेत.

BG/SK/AK