Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आण्विक सुरक्षा परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांची घेतली भेट

आण्विक सुरक्षा परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांची घेतली भेट

आण्विक सुरक्षा परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांची घेतली भेट


वॉशिंग्टन डीसी इथल्या आण्विक सुरक्षा परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड यांची भेट घेतली.

ट्रुड यांनी पदभार स्वीकारल्यापासून भारत-कॅनडा यांच्यातल्या संबंधांना नवी ऊर्जा आणि गती प्राप्त झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. दोन्ही देशांमधे आर्थिक क्षेत्रात संबंध अधिक व्यापक करण्याच्या क्षमतांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला. कॅनडाला गेल्यावर्षी आपण दिलेल्या भेटीत कॅनडाच्या पेन्शन फंडांच्या प्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीचे स्मरण मोदी यांनी केले. यापैकी काही फंडांनी भारतात गुंतवणूक करायला सुरुवात केल्याचे त्यांनी नमूद केले.

नवीकरणीय उर्जेसाठी भारताचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विषद केले. स्मार्ट सिटी, नागरी पायाभूत सुविधा, कौशल्य विकास यासारख्या क्षेत्रात कॅनडा, भारताबरोबरचे सहकार्य अधिक दृढ करु शकतो, याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. हायड्रोकार्बन क्षेत्रातल्या भारताच्या धोरणाचा उल्लेख करत कोळसा गॅसिफिकेशन आणि कोळसा खाणींबाबत कॅनडाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

भारताला भेट देण्याचे पंतप्रधानांनी दिलेले निमंत्रण ट्रुड यांनी स्वीकारले.

ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरुन यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्यावर्षीच्या ब्रिटन भेटीचे उभय नेत्यांनी स्मरण केले. भारत-ब्रिटन यांच्यातले संबंध अधिक समृद्ध आणि सखोल झाल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण सहकार्याबाबत दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी चर्चा केली. मेक इन इंडिया उपक्रमात विशेषत: संरक्षण क्षेत्रात, ब्रिटन, भारताचा भागीदार बनू शकतो, याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. व्हिझा मुद्यावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

N. Chitale / S.Tupe / M. Desai