पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री मंडळाने भारत आणि कॅनडा यांच्यातील सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. बौध्दिक संपदा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य स्थापन करण्यासाठी २३ फेब्रुवारी २०१८ रोजी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. उभय देशांमध्ये अभिनवता, सर्जनशीलता आणि आर्थिक वाढीला प्रोत्साहन देणे हा या कराराचा उद्देश आहे.
बौद्धिक संपदा अधिकारांचे उत्तम प्रकारे संरक्षण आणि आयपीआर बाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि तांत्रिक आदान -प्रदानावर एकत्रितपणे काम करण्यासाठी आणि उत्तम पद्धतींचे आदान प्रदान करण्यासाठी या करारामुळे एक व्यापक आणि लवचिक चौकट उपलब्ध होईल.
या करारांतर्गत प्राधान्य उपक्रम पुढीलप्रमाणे :
· दोन्ही देशांचे नागरिक, व्यवसाय आणि सार्वजनिक संस्थांदरम्यान आयपी जागरूकता वाढवण्यासाठी सर्वोत्तम पद्धती, अनुभव आणि ज्ञानाचे आदान प्रदान
· विशिष्ट आयपी क्षेत्राशी संबंधित मनुष्यबळासह परस्पर संपर्क साधण्यासाठी तज्ज्ञांचे आदान-प्रदान
· सहभागी संस्थांद्वारे स्वतंत्र किंवा संयुक्तपणे आयोजित कार्यक्रम, प्रशिक्षण आणि समारंभातील भागीदारीच्या माध्यमातून उद्योग, विद्यापीठे, संशोधन आणि विकास संस्था तसेच छोटे आणि मध्यम उद्योगांबरोबर आयपीवर उत्तम पद्धती, अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान आणि प्रसार
· आयपीमध्ये आधुनिकीकरण प्रकल्प, नवीन आणि विद्यमान माहिती प्रणालीचे स्वयंचलन आणि अंमलबजावणीच्या विकासात सहकार्य
· पारंपरिक ज्ञानाचे कशा प्रकारे संरक्षण केले जावे हे जाणून घेण्यासाठी आणि पारंपरिक ज्ञानाशी संबंधित माहिती आणि विद्यमान आयपी प्रणालींबाबत जागरूकता वाढवण्याबरोबरच सर्वोत्तम पद्धतींच्या आदान प्रदानात सहकार्य
· स्थानिक आयपी आणि व्यवसाय समुदायांसाठी आयपी संबंधित प्रशिक्षणात सहकार्य आणि
· परस्पर निर्णयानुसार सहकार्य उपक्रम
N.Sapre/S.Kane/P.Malandkar