पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात ऐतिहासिक रौप्यपदक जिंकल्याबद्दल सर्वेश कुशारे याचे अभिनंदन केले.
उत्कृष्ट कामगिरी करत सर्वेशने या क्रीडा प्रकारातील पदकासाठी भारताची पाच दशकांची प्रतीक्षा संपवल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
चिकाटी आणि दृढनिश्चयाच्या बळावर मिळवलेले हे यश खरोखरच संस्मरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान कार्यालयाने X वरील पोस्टमध्ये म्हटले:
“आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात सर्वेश कुशारे याने पटकावले ऐतिहासिक रौप्यपदक! उत्कृष्ट कामगिरी करत त्याने या क्रीडा प्रकारातील पदकासाठी भारताची पाच दशकांची प्रतीक्षा संपवली आहे. चिकाटी आणि दृढनिश्चयाच्या बळावर मिळवलेले हे यश खरोखरच संस्मरणीय आहे. PM @narendramodi”
A historic Silver for Sarvesh Kushare in the Men’s High Jump at the Asian Games! With a superb effort, he has ended India’s five-decade wait for a medal in this event. It is truly a memorable achievement powered by perseverance and determination: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 27, 2026
* * *
सुषमा काणे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai