Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक गोल्फ प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रणवी शरथ उर्स यांचे अभिनंदन केले


 

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक गोल्फ प्रकारात भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रणवी शरथ उर्स यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, तिच्या या उत्कृष्ट कामगिरीने देशाला क्रीडा क्षेत्रातील एक अविस्मरणीय क्षण दिला आहे. या विजयामुळे अधिक भारतीय तरुण या खेळाकडे आकर्षित होतील आणि सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरित होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी यांनी प्रणवी शरथ उर्स यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ (X) वर पोस्ट केले आहे:

“इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद घेण्याजोगा क्षण!

आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या वैयक्तिक गोल्फ प्रकारात भारतासाठी पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रणवी शरथ उर्सचे अभिनंदन. तिच्या या शानदार कामगिरीने देशाला क्रीडाविश्वातील एक अविस्मरणीय क्षण दिला आहे. या विजयामुळे अधिक तरुण भारतीय या खेळाकडे आकर्षित होतील आणि सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरित होतील, अशी आशा आहे. उत्कृष्ट कामगिरी, प्रणवीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा: पीएम @narendramodi”

***

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai