Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल आणि सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी मोना अग्रवालचे अभिनंदन केले


नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मोना अग्रवाल यांचे अभिनंदन केले आहे.

मोनाच्या उत्कृष्ट कामगिरीने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमध्ये एक नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे, ज्यामुळे भारताचा आजचा पहिला  दिवस अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरला, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.पंतप्रधानांनी तिची अचूकता, दृढनिश्चय  आणि संयम या गुणांची प्रशंसा केली आहे आणि पुढील स्पर्धांमध्ये तिला सतत यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांच्या कार्यालयाने X वर लिहिले आहे;

“2026 यावर्षाच्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमधील महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मोना अग्रवालचे अभिनंदन! तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, तिने आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धांमधे एक नवीन विक्रमही प्रस्थापित केला आहे!  ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे, ज्यामुळे भारताचा स्पर्धेचा पहिला दिवस आणखी खास बनला आहे. तिची अचूकता, दृढनिश्चय आणि संयम हे गुण खरोखरच प्रशंसनीय आहे.पुढील काळात स्पर्धांमध्ये तिला सतत यश मिळो, ही कामना : PM @narendramodi”

 

* * *

निलिमा चितळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai