Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियाई पॅरा गेम्समध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल तेजलबेन दामोर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले


नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेजलबेन दामोर यांचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि आशियाई पॅरा गेम्स 2026 मधील महिलांच्या 400 मीटर टी12 प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.

मोदी म्हणाले की, त्यांचा वेग, दृढनिश्चय आणि उत्कृष्टतेप्रती असलेली त्यांची बांधिलकी खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी या यशाबद्दल तेजलबेन यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटले की,

“तेजलबेन दामोर यांची आणखी एक उत्कृष्ट कामगिरी!

त्यांनी आशियाई पॅरा गेम्स 2026 मध्ये महिलांच्या 400 मीटर टी12 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे.

त्यांचा वेग, दृढनिश्चय आणि उत्कृष्टतेप्रती असलेली बांधिलकी खरोखरच कौतुकास्पद आहे.

या यशाबद्दल तेजलबेन यांचे अभिनंदन: PM @narendramodi”

 

* * *

सुषमा काणे/राजेश शिरभाते/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai