Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियायी क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश प्रकारात महिला एकेरीचे रौप्यपदक जिंकल्याबद्दल अनाहत सिंग हीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2026

 

आशियायी क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश या क्रीडा प्रकारात महिला एकेरीत रौप्यपदक विजेती दमदार कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनाहत सिंग हिचे  अभिनंदन केले. अनाहतची कामगिरी खूपच प्रभावशाली होती असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

विशेषतः दिग्गज खेळाडूंविरुद्ध खेळताना अनाहत हीने उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवले असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. अनाहत हिने अशाच तऱ्हेने यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करावीत आणि भारतासाठी आणखी बहुमान मिळवून द्यावा, अशी सदिच्छाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात X या समाजमाध्यमावर पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केलेला संदेश:

“@Anahat_Singh13 हीची रौप्यपदक विजेती दमदार कामगिरी ! आशियायी क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश या प्रकारात महिला एकेरीतील तिची  कामगिरी अत्यंत प्रभावशाली होती.  विशेषतः सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळताना तिने अफाट कौशल्य दाखवले. ती यशाची अशीच नवनवी शिखरे सर करत राहो आणि भारताला आणखी बहुमान मिळवून देवो हीच सदिच्छा : PM @narendramodi”

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai