पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2026
आशियायी क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ‘ट्रॅप टीम’ प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल मनीषा कीर, नीरू आणि आशिमा अहलावत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या या कामगिरीचे वर्णन अचूकता, एकाग्रता आणि उत्कृष्ट संघभावनेचे एक कौतुकास्पद उदाहरण म्हणून केले. त्यांनी संपूर्ण संघाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच त्या भारतासाठी अशीच आणखी यशोशिखरे गाठत राहतील असा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधान कार्यालयाने ‘X’ वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे:
“आशियायी क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या ट्रॅप टीम प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल मनीषा कीर, नीरू आणि आशिमा अहलावत यांचे हार्दिक अभिनंदन.
ही अचूकता, एकाग्रता आणि संघभावनेची एक अत्यंत कौतुकास्पद कामगिरी होती. संपूर्ण संघाने अशीच उत्कृष्ट कामगिरी करत राहावी आणि भारताचे नाव उज्ज्वल करत राहावे या शुभेच्छा: पंतप्रधान @narendramodi”
Congratulations to Manisha Keer, Neeru and Aashima Ahlawat on winning the Silver medal in the Women’s Trap Team event at the Asian Games.
It was a commendable display of precision, focus and teamwork. May the entire team continue to excel and bring more laurels to India: PM…
— PMO India (@PMOIndia) September 29, 2026
* * *
शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai