Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल शीतल देवी हिचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2026 

 

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या वैयक्तिक पॅरा कंपाऊंड तिरंदाजी या क्रीडा प्रकारात सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकत यशस्वीपणे आपले पदक राखल्याबद्दल शीतल देवी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केले आहे.

तिची अचूकता, सातत्य आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेप्रती असलेले समर्पण खरोखरच उल्लेखनीय असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. त्यांनी शीतल देवी हिला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर लिहिले आहे,

“आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिलांच्या वैयक्तिक पॅरा कंपाऊंड तिरंदाजी या क्रीडा प्रकारात शीतल देवी हिची उत्कृष्ट कामगिरी! तिने सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकत यशस्वीपणे आपले पदक राखले. तिची अचूकता, सातत्य आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेप्रती असलेले समर्पण खरोखरच उल्लेखनीय आहे.

तिला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा: PM @narendramodi”

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai