Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आसाममधील शिवसागर येथे श्रीमंत शंकरदेव संघाच्या 85 व्या वार्षिक परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

s2016020576729


मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी, सर्व वरिष्ठ महापुरुष आणि मोठया संख्येने आलेले सर्व महापुरुष,

मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्वांना प्रणाम करतो, ज्यांनी अशा पवित्र प्रसंगी येथे उपस्थित राहण्याची मला संधी दिली. कोणी कल्पना करु शकते की, पाच शतकांपेक्षाही आधी एखाद्या व्यक्तीला, त्या काळात कॅमेरा नव्हता, वृत्तपत्रे नव्हती, टीव्ही नव्हता, दूरध्वनी नव्हता, तरी देखील पाच शतकांचा काळ लोटूनही आपण त्या महापुरुषाचे स्मरण करतो. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो. ती व्यक्ती किती विलक्षण प्रतिभेचे असेल, जिने शतकानुशतके समाजावर असा ठसा उमटवला आहे. अशा श्रीमंत शंकरदेव गुरुवर्यांच्या चरणी मी प्रणाम करतो. त्यांचे वैशिष्टय पहा. येथे तर सर्वजण बसला आहात, त्यांच्याबाबत प्रत्‍येक गोष्ट जाणता, त्यांची प्रत्येक गोष्ट जगण्याचा प्रयत्न करता, शतकांपूर्वीचे त्यांचे विचार आज देखील जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा प्रयत्न करता. आणि म्हणूनच मी त्यांच्याविषयी काही सांगेन, त्याहून अधिक तुम्ही सर्व त्यांना चांगल्या प्रकारे जाणता.

जेव्हा भारताच्या अन्य भागांमधून त्यांच्याविषयी लोकांना माहिती मिळते, तेव्हा खूप आश्चर्य वाटते, त्यांनी अध्यात्माला जीवनाच्या रंगाशी जोडले होते. साधारणत: आपले अध्यात्म्याचे विचार असे राहिले, जे कधी कधी साध्या जीवनाला नाकरत राहिले. मात्र श्रीमंत शंकरदेव हे जीवनातल्या रंगांमध्येच अध्यात्म भरणारे एक नवीन मार्गदर्शक बनले. कोणी विचार करु शकते अध्यात्म आणि नाटकाच्या संबंधांबाबत. कोणी विचार तरी केला असेल अध्यात्म आणि कलेच्या संबंधाबाबत. कोणी विचार केला असेल अध्यात्म आणि नृत्य यांच्या संबंधाबाबत, कोणी विचार केला असेल अध्यात्म आणि गाण्याच्या संबंधाबाबत, त्यांनी कला, नृत्य, नाटय, संगीत जी समाज जीवनाची सहज प्रवृत्ती होती, तिलाच अध्यात्माच्या रंगात रंगवून टकाले आणि त्यामुळेच आजही श्रीमंत शंकरदेव आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत जेवढे त्यांच्या स्वत:च्या जीवनकाळात होते.

दूर आसाममध्ये राहणारा हा संत, हा अध्यात्मिक महामानव पाच शतकांपूर्वी म्हणाला होता की आपण असे आसामी बनायला हवे, असे आसामी बनायला हवे कि आपण उत्तम भारतीय बनायला हवे. राष्ट्रवादाचा हा संदेश इतक्या शतकांपूर्वी कोणी महापुरुषच देऊ शकतो. ते असेही म्हणायचे की, आपल्याला राष्ट्र निर्माण करण्यासाठी देखील व्यक्ती निर्माण हाच आपला मार्ग असेल आणि यासाठी समाजातील प्रत्येक माणसाला अशा प्रकारे जोडायला हवे कि जेणेकरुन समाज अशी शक्ती म्हणून उदयाला येईल, जी स्वत:च्या हिमतीवर विकास देखील करेल, अध्यात्मिक चेतना देखील जागवेल आणि संकटांवर मात देखील करेल. ते असे अध्यात्मिक महापुरुष होते, जे शास्त्रामध्ये समर्पित होते. त्यांनी आपल्याच भक्तांना आततायीपणाविरोधात लढायला तयार केले, बलिदान देण्यासाठी तयार केले. काय ? मातृभूमीचे रक्षण करायचे आहे, अध्यात्माचे रक्षण करायचे आहे, महान उज्वल परंपरांचे रक्षण करायचे आहे.

आज देखील आपल्या समाजात ज्या वाईट प्रथा आहेत, भले त्या कमी झाल्या असतील, मात्र कधी-कधी त्या वाईट गोष्टी नजरेस पडतात, तेव्हा किती वेदना होतात. हिंदू समाजाचे एक वैशिष्टय आहे. हजारो वर्षे जुना समाज आहे. काळाच्या ओघात त्यात काही विकृती देखील आल्या, वाईट गोष्टीही आल्या, मात्र या समाजाचे एक वैशिष्टय होते की आपल्यामधूनच असे महापुरुष निर्माण केले जे स्वत: समाजातील वाईट प्रथांविरोधात लढाई लढायला मैदानात उतरले. ही छोटी गोष्ट नाही. आज देखील कुठेही अस्पृश्यतेविरुध्द बोलायचे असेल, तर कधी कधी लोकांना वाटते की आता काय गरज आहे ? श्रीमंत शंकरदेव यांनी पाच शतकांपूर्वी अस्पृश्यतेविरोधात, उच्च-कनिष्ठ भेदाविरोधात, सामाजिक एकतेसाठी, जिथे गेले तिथे, त्यांनी संपूर्ण भारत पालथा घातला होता, त्या काळी, किती कष्ट सोसले असतील, आणि त्यांनी हा संदेश पोहचवला की समाजात या ज्या विकृती आहेत, त्या विकृती संपायला हव्यात. समाजात ज्या वाईट पध्दती आहे त्या संपायला हव्यात. युगांच्या अनुसार कधी-कधी वाईट गोष्टी बदलतात. आजच्या काळात श्रीमंत शंकरदेव यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारी आणि इतकी समर्पित तुम्हा लोकांची सेना आहे.

एवढा मोठा कार्यक्रम करायचा असेल तर सरकारला 50 वेळा विचार करावा लागतो आणि मी पाहत आहे, मी हेलिकॉप्टरमधून पाहत होतो, जिथे नजर जायची, लोकच लोक दिसत होते लाखोंच्या संख्येने ही कशी अध्यात्मिक शक्ती आहे, ही कशी सात्विक ताकद आहे ? आपला देश पुढे नेण्यासाठी, आपला “सबका साथ, सबका विकास” हा जो मंत्र आहे, त्यासाठी ही अध्यात्मिक चेतना, अध्यात्मिक शक्ती, सात्विक शक्ती बहुमूल्य आहे आणि त्याची शक्ती जोडली तर देश अधिक वेगाने पुढे जातो.

आज देखील श्रीमंत शंकरदेव संस्थानाद्वारे संशोधन, साहित्य, शिक्षण, लोक-संस्कार आज समाज कल्याणाचे कार्य सुरु आहे.

ही गोष्ट खरी आहे, इतकी वर्षे झाल्यावर छोटे-मोठे वाद होऊ शकतात. मात्र सर्वांनी मिळून मिसळून काम करणे योग्य आहे. खांद्याला खांदा लावून काम केले तर ही शक्ती आणखी उजळेल आणि समाजाची एक नवी ताकद बनेल. हा माझा विश्वास आहे एक सात्विक प्रवृत्ती सुरु आहे, शिक्षणाचे कार्य सुरु आहे आणि अनेक मुद्दे संस्थेच्या प्रमुखांनी माझ्यासमोर मांडले आहेत. मी या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करेन आणि यापैकी जे शक्य आहे ते करण्यापासून मागे हटणार नाही, कारण हे काम तुम्ही करत आहात. आता समजा, मला आसामध्येच स्वच्छ भारत अभियान चालवायचे असेल, आणि जर तुम्ही लोकांनी मनात आणले, तर सरकारची गरज भासेल का ? आसाम कधी अस्वच्छ होईल का ? जर तुम्ही लोकांनी ठरवलेत, श्रीमंत शंकरदेव यांच्या नावाने जय गुरु शंकर म्हणून उतरलात, तर मला नाही वाटत कि आसाममध्ये अस्वच्छता राहू शकेल. स्वच्छ भारत अभियान आसाममध्ये एक उदाहरण बनू शकते. आपल्याकडे मुलांसाठी पोलिओ डोस, मुलांसाठी लसीकरण हे सरकारचे खूप मोठे अभियान असते. एकही बालक लसीकरणशिवाय राहू नये. एकही बालक पोलिओ डोस शिवाय राहू नये हे एवढे मोठे काम आहे आणि जर आपण या संस्थेचे लोक यात सहभागी झालात, तर मला नाही वाटत की सरकार जरी कमी पडले तरी तुम्ही कमी पडणार नाहीत आणि समाजाची ताकद बनाल हा माझा विश्वास आहे.

सरकार आणि समाजाची शक्ती एकत्र यायला हवी. सरकार आणि समाजाची शक्‍ती यांनी एकत्रितपणे निर्धारित लक्ष्याच्या पुढे जायला हवे. तेव्हाच आपण श्रीमंत शंकरदेव यांना जसा भारत हवा होता तसा भारत बनवू शकू. शंकरदेव यांची स्वप्ने आपण पूर्ण करु शकतो. आणि या अध्यात्मिक प्रसंगी मी गुरुदेव यांना प्रणाम करतो, पुन्हा एकदा तुम्ही इतके चांगले कार्य करत आहात, इतके सात्विक काम करत आहात, मी दिल्लीचे सरकार तुमच्या बरोबर उभे राहण्यासाठी कधीही मागे हटणार नाही. हा विश्वास मी तुम्हाला देतो.

खूप-खूप धन्यवाद !
जय गुरुशंकर !

S.Kane/S.Tupe/M.Desai