पीएम्इंडिया
इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय विकास राज्य सचिव खासदार प्रीति पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
आंतरराष्ट्रीय विकास राज्य सचिव पदी पटेल यांची नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. पटेल यांनी यापूर्वी अनेकदा भारताचा दौरा केल्याची तसेच विविध पदांवर असताना भारताबरोबरच्या दीर्घकालीन संबंधांच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये केलेल्या इंग्लंडच्या यशस्वी दौऱ्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली आणि दौऱ्यातील निर्णयांबाबत केलेल्या पाठपुराव्याची प्रशंसा केली.
पटेल यांनी आंतरराष्ट्रीय विकास विभागाच्या भारतातील भविष्यातील योजना आणि उपक्रमांची पंतप्रधानांना माहिती दिली. तसेच कौशल्य विकास, पायाभूत सुविधा अर्थसहाय्य, नाविन्यता, ऊर्जा आणि व्यापार सुलभिकरण आदी क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबाबत पटेल यांनी चर्चा केली.
B.Gokhale/S. Kane/ D. Rane