Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. ला 2007-08 ते 2012-13 साठी भांडवल उभारणीस कार्योत्तर मंजूरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत, इंडियन इन्फ्रास्ट्रक्टर फायनान्स कंपनी लिमिटेडला (आयआयएफसीएल) 2600 कोटी रुपयांच्या भांडवलासाठी मंजूरी देण्यात आली. भांडवलासाठीची ही मंजूरी कार्योत्तर आहे. ही मंजूरी 2007-08 ते 2012-13 च्या अनुदानाच्या मागणीतून (डिमांड फॉर ग्रॅण्टस) कंपनीला भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी देण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

आयआयएफसीलएल, ही पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची कंपनी असून कंपनी कायदा 1956 अंतर्गत, 05 जानेवारी 2006 रोजी तिची विधिसंस्थापितरित्या स्थापना करण्यात आली आहे. स्थापनेवेळी कंपनीचे 100 कोटी रुपयांचे भाग भांडवल होते. कंपनीच्या कामाला एप्रिल 2006 पासून सुरुवात झाली. स्कीम फॉर फायनान्सिंग व्हायबल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस (एसआयएफटीआय) अंतर्गत आयआयएफसीएल दीर्घकालीन कर्जपुरवठा करते.

S. Thakur/N.Sapre