Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘इन्सॅट-3डीआर’च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांकडून इस्रोच्या संशोधकांचे अभिनंदन


‘इन्सॅट-3डीआर’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. ‘जीएसएलव्ही-एफ05’ यानाच्या सहाय्याने ‘इन्सॅट-3डीआर’ या अत्याधुनिक हवामान उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. या यानामार्फत केलेले हे दहावे प्रक्षेपण आहे.

‘आपल्या अंतराळ कार्यक्रमाने नवनवीन उच्चांक गाठून प्रत्येकवेळी अभियानाने आपली मान सदैव उंचावली आहे. ‘इन्सॅट-3डीआर’चे यशस्वी प्रक्षेपण, हा अतिव आनंदाचा क्षण आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा आपले अद्वितीय कौशल्य दाखवले आहे. कामाविषयी त्यांनी दाखवलेले बेजोड समर्पण आणि दृढनिश्चयाबद्दल इस्रोच्या संशोधकांचे मनापासून अभिनंदन’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor