Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आणि ओमानच्या बँकिंग आणि वित्तीय अभ्यास महाविद्यालयादरम्यान सामंजस्य कराराच्या नूतनीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि ओमान दरम्यान २००८ आणि २०११ मध्ये स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आणि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आणि ओमानच्या बँकिंग आणि वित्तीय अभ्यास महाविद्यालयादरम्यान सामंजस्य कराराच्या नूतनीकरणाला मंजुरी दिली. या करारामुळे ओमान मध्ये लेखा, वित्तीय आणि लेखा परीक्षण ज्ञानाचा पाया मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करता येईल.

मध्य-पूर्व भागात आयसीएआयची सदस्य संख्या ६ हजारांवर आहे आणि या करारामुळे ओमानी नागरिकांना आयसीएआयचे सदस्य बनवून सहकार्य पुरवणे शक्य होईल. तसेच आयसीएआयच्या सदस्यांना आपले व्यावसायिक क्षितिज विस्तारण्याची संधी मिळेल.

(B. Gokhale/ S.Kane)