Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961 अंतर्गत सहा नव्या आयआयटी आणण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


सहा नव्या आयआयटीच्या समावेशासाठी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961 मधे सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी दिली. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती, केरळमधल्या पल्लकड, कर्नाटकमधल्या धारवाड, छत्तीसगडमधल्या भिलाई, गोवा, जम्मू, इथल्या सहा नव्या आयआयटीच्या समावेशासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे. इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961 अंतर्गत धनाबाद इथल्या आयएसएमचे आयआयटीत रुपांतर करायलाही मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मंजूरी दिली.

या मंजुरीमुळे इन्‍स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961 अंतर्गत सहा नव्या आयआयटी येणार असून, त्यांना राष्ट्रीय महत्वाच्या संस्था म्हणून घोषित करण्यात येईल. धनाबाद इथल्या आयएसएमचे आयआयटीत रुपांतर करायलाही मंत्रिमंडळाने मंजुरी देऊन या संस्थेला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961 अंतर्गत आणण्यात आले आहे, तसेच या संस्थेला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणूनही जाहीर करण्यात आले आहे.

N. Chitale / B. Gokhale