Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

इराकच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार हाती घेतल्याबद्दल अली फलिह कादिम अल-झैदी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


 

फलिह कादिम अल-जैदी यांनी इराकच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इराकसोबत असलेले आपले दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण संबंध भारताच्यादृष्टीने खूप मोलाचे असून आपले सर्व क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचेही मोदी यांनी या अभिनंदनाच्या संदेशात म्हटले आहे.

एक्स समाजमाध्यवरील संदेशात मोदी म्हणतात:

“अली फलिह कादिम अल-जैदी यांनी इराकच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

इराकसोबत असलेले दीर्घकाळापासूनचे आणि मैत्रीपूर्ण संबंध भारतासाठी अत्यंत मोलाचे असून सर्व क्षेत्रांमध्ये आपले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी तो कटिबद्ध आहे.

मी त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो तसेच आपल्या दोन्ही देशांची सामायिक प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्र काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”

***

अंबादास यादव/मंजिरी गानू