पीएम्इंडिया
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे आर्थिक घडामोडी आणि वित्तमंत्री डॉ. अली तय्यबनिया यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्र्याच्या सह अध्यक्षतेखाली होणाऱ्या द्विपक्षीय संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी तय्यबनिया भारतात आले आहेत.
इराणबरोबरच्या संबंधांना भारत अत्युच्च महत्त्व देत असल्याच्या भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या. जुलै 2015 मध्ये ब्रिक्स शिखर परिषदे दरम्यान उफा येथे राष्ट्राध्यक्ष रुहानी यांच्यासमवेत झालेली बैठक फलदायी झाल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. व्यापार, गुंतवणूक, तेल आणि नैसर्गिक वायु, दळणवळण, बंदर विकासासह इतर क्षेत्रात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.
N.Chitale/M.Desai
Had comprehensive discussions with Dr. Ali Tayyebnia, Minister of Economic Affairs and Finance of Iran. pic.twitter.com/ozo9kjJi9A
— Narendra Modi (@narendramodi) December 28, 2015