पीएम्इंडिया
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि अंगोला यांच्यातल्या द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठीच्या सामंजस्य कराराची मंत्री मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत माहिती देण्यात आली.
ई प्रशासन, माहिती तंत्रज्ञान शिक्षणासाठी मनुष्यबळ विकास, माहिती सुरक्षा, इलेट्रॉनिक्स हार्ड वेअर उत्पादन,
टेली मेडिसिन या क्षेत्रात घनिष्ट सहकार्याला प्रोत्साहन देण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.
पूर्वपीठीका:
माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रात, द्विपक्षीय आणि क्षेत्रीय सहकार्य चौकटी अंतर्गत, आंतर राष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणे इलेट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला अनिवार्य आहे. माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रात, माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी आणि घनिष्ट सहकार्यासाठी, इलेट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने विविध देशातल्या संस्था आणि एजंसी समवेत सामंजस्य करार केले आहेत.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane