पीएम्इंडिया
गुवाहाटीमधली डॉ. बी. बोरोह कर्करोग संस्था, अणू ऊर्जा खात्याकडे सोपवून त्यावर टाटा मेमोरियल केंद्राचे प्रशासकीय नियंत्रण ठेवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याशिवाय वैद्यकीय, निम वैद्यकीय, आणि सहाय्यकारी अशा 166 अतिरिक्त पदाच्या निर्मितीलाही मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.
कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्यासाठी मर्यादित उपचार सुविधा आणि ईशान्येकडे आणखी संशोधन करण्यासाठी रुग्णालयांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. संस्था बळकटीकरणासाठी 150 कोटी रुपये अपेक्षित असून त्याचबरोबर 45 -50 कोटी रुपये वार्षिक आवर्ती खर्च येणार आहे. या संस्थेच्या रुग्णालयात सध्या 209 खाटा तर अति दक्षता विभागात 9 खाटा आहेत.
N.Sapre/N.Chitale/Anagha