Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उज्जैन सिंहस्थ मेळावा व्यवस्थेचे पंतप्रधानांकडून कौतुक


उज्जैन सिंहस्थ मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी केलेल्या व्यवस्थेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “ट्विटर” च्या माध्यमातून कौतुक केले आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्ली इथे पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सिंहस्थ पर्वणीमध्ये भाविकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेल्या व्यवस्थेची माहिती दिली. सिंहस्थकाळात होणारी गर्दी लक्षात घेऊन उज्जैन नगरी आणि नदीचे पात्र स्वच्छ राखण्यावर भर देण्यात आला आहे. मध्यप्रदेश शासनाने केलेल्या या प्रयत्नांची पंतप्रधानांनी “ट्विटर” वरुन प्रशंसा केली आहे.

S. Bedekar / B. Gokhale