पीएम्इंडिया
भगिनी आणि सज्जन हो,
भगवान शंकरांना प्रिय असलेल्या श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भोळ्या सांब सदाशिवाचे भक्त कावड हाती घेवून निघाले आहेत. एकाप्रकारे आतापासून ते दिवाळीपर्यंत सण-उत्सवांचे वातावरण असते. आगामी सण समारंभासाठी मी आपल्या सर्वांना आणि देशवासियांना खूप-खूप शुभेच्छा देतो. खूप-खूप सदिच्छा व्यक्त करतो.
मित्रांनो, सणांच्याबरोबरच देशाच्या बहुतांश भागामध्ये उत्तम पाऊसमानही यंदा होत आहे. हवामानाची झालेली चांगली कृपा शेतीसाठी, अर्थव्यवस्थेसाठी चांगल्या अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते. परंतु देशाच्या काही भागामध्ये अतिवृष्टीमुळे काही जनतेला गंभीर संकटाला सामोरं जावं लागत आहे. संततधार वृष्टी आणि महापुरामुळे या लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. सरकार या पूरस्थितीकडे अगदी बारकाईने, काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे. पुराच्या संकटामध्ये सापडलेल्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी राज्य सरकारांच्या मदतीने केंद्रसरकार कार्यरत आहे.
मित्रांनो, एक संवेदनशील सरकार या नात्याने सामान्य जनतेपुढे निर्माण झालेल्या संकटातून त्यांना बाहेर काढणे, जनतेचे जीवन अधिकाधिक सुकर आणि सोपे बनवण्याचं कार्य केले पाहिजे. मला वाटतं की, राज्याची ही सर्वात प्राथमिक आणि महत्वाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर आमचेही हे एकमात्र ध्येय आहे. गेले चार वर्षे हाच विचार मनाशी पक्का ठेवून आम्ही निरंतर कार्यरत आहोत आणि आज लखनौच्या या सभागृहामध्ये आपण सर्वजण एकत्रित झालो आहोत, हाही या विचाराचांच एक भाग आहे. लखनौसारख्या शहरांमधल्या जनतेचे जीवन अधिक स्मार्ट आणि सुविधा संपन्न व्हावे, यासाठी आयोजित कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची मला कालच संधी मिळाली. उत्तर प्रदेशातल्या लखनौसहीत इतर विविध शहरात सुरू करण्यात येत असलेल्या अनेक महत्वाच्या योजनांचा शिलान्यास यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर गरीब बेघर बंधू-भगिनींना, त्यांच्या स्वमालकीच्या घराच्या किल्ल्या सोपवण्याची संधीही मला मिळाली. उत्तर प्रदेश सरकारचे हे सर्व कार्य पाहून मला खूप आनंद झाला आहे. आज उत्तर प्रदेशातल्या काना-कोपऱ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून संकल्प करून पुढे जाण्यासाठी मार्गक्रमण करीत आहोत.
मित्रांनो, गेल्या पाच महिन्यांमध्ये आज दुसऱ्यांदा उद्योग क्षेत्राशी संबंधित असलेल्या सहकारींना मी लखनऊमध्ये पुन्हा भेटत आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये उत्तर प्रदेशा गुंतवणुकदारांची परिषद झाली होती, त्यावेळी आलो होतो. उत्तर प्रदेशामध्ये सव्वा चार लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूका करण्याचा निर्धार असल्याची माहिती मला त्या परिषदेत देण्यात आली होती. या निर्धाराप्रमाणे आज प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होत आहे, आणि हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आज खूप महत्वाचे पाऊल उचलले जात आहे, याचा मला खूप आनंद होत आहे.
आमचे सतीश जी, आज इतकं संकोचून का बोलत होते, मला माहीत नाही. अतिशय नम्र स्वरामध्ये आणि विवेकपूर्ण विचाराने सांगत होते की, ‘साठ हजार, फक्त साठ हजार’ आपल्याला भूक जास्त आहे, हे पाहूनच मला खूप चांगलं वाटत आहे. एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी दीर्घकाळ काम केलं आहे. औद्योगिक व्यवसाय ज्या राज्यात भरपूर प्रमाणात चालतात, त्या राज्यातून मी आलो आहे. 60 हजार काही खूप लहान आकडा नाही आहे, 60 हजार कोटी म्हणजे खूप मोठा आकडा आहे. आपण आज किती मोठे यश मिळवले आहे, याचा आपल्याला अजून अंदाज आलेला नाही, असं मला आपलं हे कार्य पाहून, ऐकून वाटतं.
इथं कार्यरत असलेल्या अधिकारी वर्गाचं मी अभिनंदन करतो. आपण उत्कृष्ट काम केले आहे. निधी गुंतवणूक करतांना, कोणकोणत्या अडचणी, समस्या येतात, हे मला माहिती आहे. एक तर न्यायालयीन कामकाजामध्ये प्रकरण अडकले तर दोन-दोन वर्षांपर्यंत काम खोळंबून राहते. पर्यावरण विभागाकडे फाईल गेल्यानंतर तर ते जणू त्या फाईलवर बसून राहतात नाहीतर एखाद्या वर्तमानपत्राकडून त्या प्रकल्पाची हत्या होते. सुभाष जी, असं झालं तर मग सरकारही घाबरून जाते. या व्यक्तीला काम द्यावे की नको, हा प्रकल्प करावा की नको, असा विचार मग सुरू होतो. अशाच वेळी प्रतिस्पर्धी समुहाचे लोकही वेगवेगळ्या खेळी करून प्रकल्पाचं काम कसं लटकत राहील, यासाठी मनापासून प्रयत्न करत असतात. अशा सगळ्या संकटांना पार करून, तोंड देवून पाच महिन्यांच्या आत हा उद्घाटनाचा क्षण आणणं, 60 हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या कामाचा प्रारंभ करणे म्हणजे एक अद्भूत यश मिळवल्यासारखे आहे. आपण मिळवलेल्या यशाचा मीसुद्धा अनुभव घेत आहे. आपली संपूर्ण टीम, सगळे कर्मचारी यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. या प्रकल्पासाठी ज्या ठिकाणी जमिनीची आवश्यकता होती, ती जमीन देणाऱ्या शेतकरी बांधवांचे मी अभिनंदन करतो. या कामासाठी गुंतलेले लहान-लहान कर्मचारी, इथले पटवारी यांचंही अभिनंदन करतो. कारण या मंडळींनी विरोध न करता काम केल्यामुळेच तर आज प्रकल्प सुरू होत आहे. देश एक पंतप्रधान तरी चालवत असतात किंवा पटवारी चालवत असतात आणि म्हणूनच हे नेतृत्वाचे यश आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये मुख्यमंत्र्यांपासून ते पटवारीपर्यंत सर्वजण एक समूह बनून एकाच ध्येयाचा एक दिशेने विचार करत पुढे जात आहेत.
मला आणखी एका गोष्टीचा आनंद होत आहे. आपण या सर्व गोष्टी कुठंही वैयक्तिक म्हणून केल्या नाहीत. वेगवेगळ्या विभागासाठी धोरण बनवले. सर्व गोष्टी अगदी कोणालाही जाणून घेता येतील, अशा पद्धतीने मुक्त ठेवल्या. कोणालाही काही प्रश्न असेल तर सर्व व्यवहार ऑनलाईन पाहता येतील, अशी सोय केली. जर एखाद्याला वाटलं की, आपण या योजनेमध्ये अमूक एका ठिकाणी सहभागी होवू शकतो, तर ती व्यक्ती गुंतवणूक करून सहभागी होवू शकते. असे ‘पॉलिसी ड्रिव्हन स्टेट’ बनणे, ही उत्तर प्रदेशचे चांगले, मोठे आणि महत्वपूर्ण यश आहे, असे मला वाटते. आणि म्हणूनच कृपा करून या 60 हजारांना, साठ हजार कोटींना कमी लेखू नका, कमी मानू नका. आपण जे काही मिळवले आहे, ते अद्भूत आहे, याची मला चांगली कल्पना आहे, कारण अशा प्रकारचे काम मी दीर्घकाळापासून करत आलो आहे. या कामासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात. प्रत्येक पातळीवर किती पुढाकार घ्यावा लागतो. कोणत्याही गोष्टीसाठी अनेक जणांचा किती पाठपुरावा करावा लागतो. लोकांची किती बोलणी खावी लागतात, हे मला चांगले माहीत आहे. परंतु राज्याविषयी जर कटिबद्धता असेल, तर अनेक समस्यांमधून मार्गही निघतात.
मला आणखी एका गोष्टीचा आनंद झाला आहे. आता असं आहे पहा, कोणत्याही सायकलच्या ट्यूबमध्ये विशिष्ट पाॅइंट हवा भरली की पुरेशी असते. योग्य दबावाने हवा भरली की सायकल चालते. परंतु काही वेळेस काय होतं की त्या ट्यूबमध्ये अगदी एका कोपऱ्यामध्ये कुठंतरी फुगा येतो. तो भाग चांगलाच फुगलेला असतो. आता आपण हवेच्या दाबाचे मीटर पाहिले तर ते बरोबर असते आणि किती पॉईंट हवा भरली त्याचा आकडाही दाखवत असते. मात्र सायकल चालू-धावू शकत नाही. अशावेळी ती हवाच सायकलला थांबवत असते. हे सगळे तंत्र आपण जाणून घ्यावे लागते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वांगीण विकासाकडे चांगले लक्ष दिले आहे, याचा मला आनंद होत आहे. उत्तर प्रदेशच्या सर्व क्षेत्रांना विकासाची संधी मिळाली पाहिजे. राज्याचा संतुलित विकास झाला पाहिजे. समतोल विकास ही उत्तर प्रदेशच्या दृष्टीने मोठी आवश्यकता आहे. केवळ नोएडा, गाजियाबाद देशामध्ये अव्वल यावे आणि राहिलेल्या उत्तर प्रदेशामध्ये गरजेच्या गोष्टींचीही पूर्तता असू नये, चणचण असावी, हे बरोबर नाही. त्यामुळे सर्व राज्याचा समतोल विकास साधला पाहिजे. आज हे काम ज्या पद्धतीने होत आहे, ते पाहून मला खूप आनंद झाला आहे. राज्यातल्या विकासकामांसंबंधीचा अगदी बारीक-सारीक तपशील आत्ता या कार्यक्रमामध्ये दिला आणि जनतेपुढे सर्व गोष्टी स्पष्टपणे मांडल्या,याचाही मला आनंद झाला आहे. अशा प्रकारे पुढे होवून काम करणारी सर्व मंडळी अभिनंदनास पात्र आहेत.
काही लोक या कार्यक्रमाला ‘ग्राउंड ब्रेकिंग सेरेमनी’ असे संबोधत आहेत. तसं पाहिलं तर पायाभरणी करण्याची परंपरा चालत आली आहे. परंतु आजच्या कार्यक्रमाचा विचार केला तर हा एक ‘रेकाॅर्ड ब्रेकिंग सेरेमनी’ आहे, असं मला वाटतं. इतक्या कमी कालावधीमध्ये ज्याप्रकारे हा प्रकल्प वेगाने आकाराला येत आहे, कामाची जुनी पद्धत बदलण्यात आली आहे. हे लक्षात येत आहे. अशा प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये याआधी कोणा व्यक्तीने असे काम केले असेल, असं मला वाटत नाही. आज समाजामध्ये सरकारविषयी जो विश्वास निर्माण झाला आहे, असा विश्वास आत्तापर्यंत कोणी व्यक्ती राज्यात निर्माण करू शकली असेल, असे मला वाटत नाही. इथलं शासन-प्रशासन, काम करण्याची पद्धत, सगळं काही अगदी वेगळं, नवं आहे. योगी जी यांच्या सरकारने गुंतवणुकदारांशी चांगल्या पद्धतीने, सातत्याने संवाद कायम ठेवला. गुंतवणूक करण्याच्या त्यांच्या इच्छेचे रूपांतर प्रत्यक्ष गुंतवणुकीमध्ये परिवर्तित केले. उद्योगासाठी पोषक वातावरण तयार केले, याचा मला आनंद आहे. यासाठी ऑनलाईन ‘एमओयू ट्रॅकर’ असेल, किंवा परवाने देण्यासाठी ‘गुंतवणूक मित्र’ यासारखे एक खिडकी डिजिटल व्यासपीठ असेल, उत्तर प्रदेशातली ही बदलेली कार्यसंस्कृती म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये व्यवसायासाठी तयार झालेल्या पोषक वातावरणाचा परिचय देत आहे. एके काळी उत्तर प्रदेशामध्ये गुंतवणूक करणे हे व्यावसायिकांच्या दृष्टीने मोठे आव्हान होते, खूप मोठी समस्या मानत होते. आज हीच समस्या चांगल्या संधीमध्ये रूपांतरीत झाली आहे. मग रोजगाराच्या संधी असो, व्यापाराच्या संधी असो, चांगले रस्ते असो, पुरेसा, सुरळीत-अखंडित वीज पुरवठा असो, चांगला वर्तमान आणि उज्ज्वल भविष्य यासाठी असो, आजच्या कार्यक्रमाचे आयोजन पाहिल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारचे हे कार्य विश्वासाचे प्रतीक बनले आहे. उत्थानाचे प्रतीक आहे. उत्तर प्रदेशाच्या विकासाचे प्रतीक आहे. ज्या वेगाने हे राज्य पुढे जात आहे, हे पाहिल्यानंतर माझी खात्री आहे की, उत्तर प्रदेश लवकरच एक ट्रिलियन डाॅलरची अर्थव्यवस्था बनण्याचे आव्हान पूर्ण करेल. यासाठी फारसा वेळ लागणार नाही, असं माझं अंतर्मन सांगत आहे. उत्तर प्रदेश सरकारला, उद्योग जगतामधल्या या सर्व सहकारींना, त्यांनी ज्या पद्धतीने आपली कटिबद्धता व्यक्त केली, त्याबद्दल सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.
काही लोक उद्योजकांना आपल्या बाजूला उभे करून घेण्यासाठी घाबरतात, आम्ही काही त्या लोकांसारखे नाही. आपण पाहिलंच असेल की, काही जण उद्योगपतींबरोबर छायाचित्र काढून घेत नाहीत, मनाई करतात, काही लोकांचे तर उद्योगपतींबरोबर छायाचित्र तुम्ही घेवू शकत नाहीत. आम्ही काही असे लोक नाही. परंतु देशातला एकही उद्योगपती राहिला नसेल, ज्यांनी त्यांच्या घरी जावून त्यांना साष्टांग दंडवत घातला नाही. हे अमरसिंह इथं बसले आहेत. त्यांना सगळं काही माहिती आहे. तेच सगळा इतिहास सांगू शकतील. परंतु तर तुमचं मन आणि तुमची कृती-काम स्वच्छ असेल आणि संकल्प चांगला असेल तर कोणाबरोबरही उभे राहिलात तरी कसलाही डाग लागणार नाही. महात्मा गांधी यांचे जीवन इतके पवित्र होते की, त्यांना बिर्ला यांच्या घर-परिवारामध्ये जावून राहण्यासही कधी संकोच वाटला नाही. बिर्ला यांच्याबरोबर उभे राहण्यास त्यांना कधी संकोच वाटला नाही, कारण त्यांचे विचार स्वच्छ होते. मात्र काही लोकांना उद्योगपतींना सार्वजनिक ठिकाणी भेटायचे नाही तर पडद्यामागे जावून सगळं काही करायचं आहे, त्यांना मात्र असे डाग लागण्याची भीती वाटत असते. जर हिंदुस्तानला बनवण्यासाठी एका शेतकरी बांधवाचे परिश्रम काम करतात, एका कारागीराचे श्रम काम करतात, एका बँकर- वित्तीय कर्मचार्याचे परिश्रम असतात, एका सरकारी कर्मचार्याचे परिश्रम असतात एका श्रमिकाची मेहनत काम करत असते, अगदी त्याचप्रमाणे देशाचे उद्योजकही या देशाला बनवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडत असतात. आपण त्यांचा अपमान करायचा, चोर-लुटेरे असे संबोधन द्यायचे, ही कुठली पद्धत आहे? एक मात्र आहे, जे लोक चुकीचं काम करतात, त्यांना एक तर देश सोडून पळून जावं लागेल किंवा तुरूंगवासामध्ये दिवस काढावे लागतील. याआधी असं काही होत नव्हतं, कारण याआधी पडद्यामागेच खूप काही होत होेतं. कोण कोणाच्या जहाजांमधून फिरून येत होते, माहीत नाही, आणखी काय काय केलं जात होतं.
आणि म्हणूनच देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येकाच्या सहकार्याची आणि सहयोगाची आज आवश्यकता आहे. देशाच्या सव्वाशे कोटी नागरिकांचा सन्मान झाला पाहिजे, आदर केला गेला पाहिजे. ही आपल्या सर्व देशवासियांचीच जबाबदारी आहे. जे प्रकल्प आज सुरू करण्यात आले आहेत, यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त युवकांना थेट रोजगार मिळणार आहे. इथल्या स्थानिक लोकांनाही अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे शेतकरी बांधव असो, श्रमिक असो, युवक असो, प्रत्येकाल लाभ होणार आहे.
मित्रांनो, उत्तर प्रदेशच्या 22 कोटी जनतेला मी वचन दिलं होतं की, त्यांचे प्रेम मी अगदी व्याजासह परत करेन. आज हे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, ते म्हणजे माझ्या वचनबद्धतेचे एक महत्वपूर्ण, ठाम पाऊल आहे. हे सर्व प्रकल्प उत्तर प्रदेशामध्ये आर्थिक आणि औद्योगिक असमतोल दूर करण्यासाठी सहायक ठरणार आहेत. कारण हे राज्य काही विशेष क्षेत्रांपुरतेच मर्यादित नाही. या राज्याचा विस्तार नोएडा, ग्रेटर नोएडा, मेरठ, मुजफरनगर इथंपासून ते झांसी, हरदोई, अमेेठी, रायबरेली, आणि जौनपूर, मिर्जापूर, गोरखपूरपर्यंत आहे. हे प्रकल्प डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया या अभियानांना एक नवे परिमाण देण्याच्या दिशेने खूप महत्वपूर्ण पाऊल ठरणारे आहेत.
संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये वेगवान इंटरनेट सेवा पोहोचण्यासाठी ऑप्टिकल फायबरचे जाळे तयार करण्याचे काम असो किंवा आय टी केंद्र स्थापन करण्याचे काम असो, या डिजिटल पायाभूत सुविधेमुळे उत्तर प्रदेशाच्या विकासाला एक नवीन गती आणि नवी दिशा मिळणार आहे. त्याचबरोबर नवयुवकांना नवीन संधी मिळणार आहे. हे प्रकल्प आमच्या सरकारच्या एका व्यापक नियोजनाचा एक भाग आहे. त्यानुसार आम्ही आता डिजिटायझेशनच्या मदतीने सामान्य लोकांचे जीवन अधिक सुकर बनवू इच्छित आहोत. आम्ही एक नवी व्यवस्था निर्माण करू इच्छित आहोत. या व्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा नसेल. आम्ही करत असलेल्या कामामध्ये वेग तर असणार आहेच आणि त्यामधून संवेदनशीलताही दिसून येईल. कोणीही आपला नाही, परका नाही, छोटा किंवा मोठा नाही. सर्वांबरोबर अगदी एकसारखा व्यवहार असेल. म्हणजेच एकूण ‘‘सबका साथ सबका विकास’’ साधण्याचे कार्य आम्ही करणार आहे.
मित्रांनो, वेगवान सेवा आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी ‘डिजिटल भारत अभियान’ आज व्यापक भूमिका बजावत आहे. गावां गावांमध्ये सुरू झालेल्या तीन लाखांपेक्षा जास्त कॉमन सर्व्हिस सेंटर आज आमच्या ग्रामीण जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणत आहेत. तिकिटाचे आरक्षण असो, वीज बिल, दूरध्वनी बिल, टेलिमेडिसिन, जन-औषधी, आधार सेवा यासारख्या शेकडो सेवांसाठी आता गावातल्या लोकांना सरकारी कार्यालयामध्ये नाइलाजाने चकरा माराव्या लागत नाहीत. गावामध्ये कॉमन सव्र्हिस सेंटर आणि शहरांमध्ये मोफत वाय-फाय हॉट स्पॉटस्, स्वस्त मोबाईल इंटरनेट, गरीब, मध्यम वर्गाचे जीवन अधिक सुकर बनवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
मित्रांनो, आय टी उद्योग गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या दृष्टीने सशक्त माध्यम आहे. आज आय.टी. निर्यातीने विक्रम प्रस्थापित केला आहे. 40 लाखांपेक्षा जास्त लोक या उद्योगामध्ये कार्यरत आहेत. परंतु देशाची ही ताकद मोठ्या शहरांमध्ये, मेट्रो शहरांपुरतीच मर्यादित राहिली गेली आहे. आमच्या सरकारने ही ताकद देशाच्या लहान शहरांमध्ये आणि गावांमध्ये पोहोचवण्याचा संकल्प केला आहे आणि त्यादिशेने आम्ही काम सुरू केले आहे.
मित्रांनो, तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करण्याची सरकारी परंपरा आता बंद झाली आहे. साचेबद्ध पद्धतीनं विचार करण्यापेक्षा आता समस्येवर उत्तर शोधणे आणि त्याची सुसंगत उकल करणे या दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिलं जात आहे. सरकारची एक योजना, एक कृती याचा दुसऱ्याशी थेट संबंध आहे. डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया अभियान ही या समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण सांगता येईल. आज डिजिटल इंडिया, डिजिटल व्यवहार याचा जो प्रसार होतो आहे, त्यासाठी मोबाईल स्वस्त होण्याचाही मोठा सहभाग आहे. आणि मोबाईल स्वस्त होण्याचं कारण म्हणजे, आता भारतात फोन्स तयार होऊ लागले आहेत. भारत आज जगात मोबाईल उत्पादनाचं केंद्र बनला आहे. आज मोबाईल उत्पादनाच्या क्षेत्रात आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. या मोबाईल क्रांतीची सुरुवात उत्तरप्रदेशातून होते आहे याचा मला विशेष आनंद आहे. उत्तरप्रदेशात आज 50 पेक्षा अधिक मोबाईल उत्पादक कंपन्या आहेत. जगातल्या सर्वात मोठ्या मोबाईल उत्पादक केंद्राचे उद्घाटनही नुकतेच नोएडा इथे झाले. आजही इथे ज्या कारखान्यांचं भूमीपूजन झाले त्यात मोबाईल उत्पादनाशी संबंधित कारखानेही आहेत.
मित्रांनो, आज जे वातावरण तयार झाले आहे, त्यासाठी गेल्या चार वर्षात सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतलेत. मग थेट परदेशी गुंतवणुकीचा निर्णय असो किंवा भारतात उत्पादन करण्यासाठी, उत्पादन कंपन्यांना सवलती देण्याचा निर्णय असो, किंवा सगळ्या किचकट प्रकिया सोप्या करण्याचा निर्णय असो, या सगळ्या निर्णयामुळे देशात उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे. अनेक वर्षांपासून अडकून पडलेला वस्तू आणि सेवा कर आम्ही लागू केला. या करामुळे, देशाला करांच्या जंजाळातून मुक्त केले. आणि उद्योगजगताला त्याचा फायदा झाला.
गेल्यावर्षी देशात उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक महत्वाचा निर्णय घेतला. सार्वजनिक खरेदीत भारतात बनलेल्या उत्पादनांना प्राधान्य देण्याचा.यासंदर्भात आम्ही एक आदेश जारी करुन सरकारचे सर्व विभाग आणि संस्थामध्ये खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तू आणि सेवांसाठी देशांतर्गत उत्पादने व कंपन्याना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.
पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प जसजसे देशात पूर्ण होत जातील, तसतशी देशात गुंतवणूक वाढत जाईल. कारण ही गुंतवणूक करणं सोपे होत जाणार आहे. विशेषतः लॉजीस्टिक गोष्टींवर होणारा खर्च कमी होणार आहे.अत्याधुनिक पायाभूत सुविधेमुळे सर्वसामान्य जनतेसह उद्योग जगतालाही खूप लाभ होणार आहे.
मित्रांनो, माहिती-तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, इलेक्ट्रॉनिक उत्पादने या सगळ्या उद्योगांसाठी उत्तरप्रदेशात खूप संधी आहेत. इथे असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्राना देखील आगामी काळात पायाभूत सुविधांचा लाभ मिळणार आहे. इथले छोटे व्यापारी,उद्योजक यांना माझी आग्रहाची विनंती आहे की जे आता रोख रकमेचे व्यवहार करत आहेत, त्यांनी डिजिटल व्यवहारांकडे वळावे.
मित्रांनो, शाश्वत विकास आणि निरंतर प्रयत्न यातूनच सव्वाशे कोटी भारतीयांची स्वप्ने साकार होणार आहेत. आम्ही जेव्हा शाश्वत विकासाविषयी बोलतो, तेव्हा विजेची व्यवस्था त्याचा एक महत्वाचा घटक आहे, हे लक्षात घ्यायला हवे. स्वस्त आणि अखंड वीज सामान्य माणसाच्या आयुष्याचीही मूलभूत गरज आहे. कृषी आणि उद्योगांसाठीही वीज तेवढीच आवश्यक आहे. यामुळेच, विजनिर्मितीवर केंद्र सरकारने भर दिला आहे. आज देश पारंपरिक उर्जास्रोतांकडून हरित उर्जेकडे वेगाने वाटचाल करतो आहे.
विशेषतः सौरऊर्जेवर सरकार अधिक लक्ष देत आहे. आंतरराष्ट्रीय सौरआघाडीच्या आमच्या उपक्रमाला आज जगभरातून पाठिंबा मिळतो आहे. सौरउर्जेच्या क्षेत्रात उत्तरप्रदेशही मोठे केंद्र बनणार आहे. मिर्जापुर येथे काही महिन्यांपूर्वी एका मोठ्या केंद्राचे उद्घाटन केले गेले होते. आज इथे आणखी एका प्रकल्पाचे भूमिपूजन केले गेले आहे.
बंधू आणि भगिनींनो, आज केवळ भारतच नाही तर आफ्रिकेसह जगातल्या अनेक विकसनशील देशांना सौर तंत्रज्ञान , सौर पंप, यांसारख्या यंत्रांची गरज आहे. माझा तुम्हा सर्वांना आग्रह आहे की हरित आणि स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रासाठी आज भारतात निर्माण झालेल्या अभूतपूर्व वातावरणाचा आणि जागतिक परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी आमच्या उद्योग जगतातल्या सर्व मित्रांनी पुढाकार घ्यावा.
मित्रांनो, वीज उत्पादनापासून ते घराघरात वीज पोहचवण्याचे काम आज अत्यंत वेगाने सुरु आहे. 2013-14मध्ये आपली ऊर्जा तूट 4.2टक्के होती, चार वर्षात ही तूट आता एक टक्क्यापेक्षाही कमी झाली आहे. जो कोळसा देशात एक काळा डाग म्हणून ओळखला जाऊ लागला होता, त्याचे आज विक्रमी स्तरावर उत्खनन होत आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे आता पॉवर ग्रीड बंद होत नाहीत.
इतकेच नाही, तर विजेच्या क्षेत्रात ज्या सुधारणा केल्या गेल्या, त्यामुळे देश आणि देशातल्या सर्वसामान्य जनतेच्या हजारो कोटी रुपयांची बचत झाली आहे.
“उजाला योजने’मुळे महावितरण कंपन्यांना एक नव संजीवनी मिळाली आहे.”उजाला’ योजनेअंतर्गत घराघरात एल ई डी बल्ब लावण्यात आले, त्यामुळे गेल्या तीन वर्षात विजेच्या बिलात, विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांचे वीजबिल कमी झाले. विजेची प्रमुख ग्राहक असलेली ही कुटुंबे त्याशिवाय नगरपालिका, महानगरपालिका ज्या पथदिव्यांचे वीजबील भरतात, त्यांच्या वीजबिलात गेल्या तीन वर्षात किमान ५० कोटी रुपयांची बचत झाली आहे. जर हे ५० कोटी रुपये मोदीने अनुदान म्हणून जाहिर केले असते, तर किमान एक आठवडाभर तरी वर्तमानपत्रात तो ठळक मथळा राहिला असता. सरकारचा, माझा उदो उदो झाला असता. मात्र आम्ही अशी योजना बनवली ज्यामुळे लोकांच्या खिशातून ५० हजार कोटी रुपये वाचतील. काम करण्याची पद्धत बदलते आहे, देश बदलतो आहे. जेव्हा स्वच्छ हेतूने कामे होतात, तेव्हाच योग्यप्रकारे विकासही होतो.
मित्रांनो, आज देशात विजेची उपलब्धता खूप सोपी झाली आहे, जागतिक बँकेच्या सुलभ वीज उपलब्धता यादीत भारताने गेल्या चार वर्षांत सुमारे ८२ अंकांची उडी घेतली आहे, एवढी सुधारणा झाली आहे. देशातील प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरात मार्च महिन्यापर्यत वीज पोचवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्ही आज जलद वेगाने वाटचाल करतो आहोत.
कधीकधी मला आश्चर्य वाटते- जेव्हा आम्ही सांगतो, की सरकारने अमुकतमुक केले आहे, तेव्हा काही लोक लगेच म्हणतात-“नाही, काहीही केलेलं नाही”. मात्र जे लोक मोदींवर टीका करताहेत, त्यांनी आज लिहून ठेवावे-जेव्हा तुम्ही मोदीवर टीका करण्यासाठी काही पुरावे शोधाल, काही चुका शोधाल, तेव्हा गेल्या ७० वर्षात देशात जे झाले नाही, अशा कामांच्या याद्याही तुम्हाला सापडतील. माझ्या खात्यात फक्त चार वर्षे आहेत,इतरांच्या खात्यात मात्र ७० वर्षे आहेत.
यानंतरचे आमचे उद्दिष्ट देशात विनाअडथळा वीजपुरवठा करण्याचे आहे. आणि यासाठी वीजपारेषणाचे जाळे अधिक मजबूत करण्याचे काम सुरु आहे. आज घाटमपूर- हापूड पारेषण लाईनचे जे भूमिपूजन झाले, ते याच प्रकल्पाचा भाग आहे. उत्तरप्रदेशात आधीच्या सरकारच्या काळात, पारेषणाची अगदी जर्जर अवस्था झाली होती, तिला नवसंजीवनी देण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आम्ही पूर्ण मदत करतो आहोत.
मित्रांनो, आमचे श्रद्धेय्य आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी उत्तरप्रदेशातल्या लखनौचे दीर्घकाळ खासदार होते. ते नेहमी म्हणत- मला असा भारत बघायचा आहे, जो समृद्ध, सक्षम आणि संवेदनशील असेल. जिथे गावे आणि शहरे यांच्यात विकासाची दरी नसेल. आणि जिथे केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये श्रम आणि भांडवल याच्यात, प्रशासन आणि नागरिक यांच्यात अंतर नसेल.
अटलजींनी केवळ हे स्वप्न बघितले नाही तर ते साकार करण्याचा स्पष्ट आराखडाही तयार केला. अटलजींनीच कधीतरी म्हंटले होते की रस्ते हे हातावरच्या रेषांसारखे असतात. याच विचारातून त्यांनी पायाभूत सुविधांवर भर दिला होता. अटलजींचा हाच विचार, एकविसाव्या शतकाच्या गरजेनुसार पुढच्या स्तरावर नेण्याचा प्रयत्न आम्ही पूर्ण ताकदीनिशी करतो आहोत.
उत्तर प्रदेशात, पूर्वांचल एक्स्प्रेससारख्या देशातल्या सर्वात मोठ्या द्रुतगती महामार्गाचे काम असो, बुंदेलखंड येथे संरक्षण उद्योगपपट्ट्याची स्थापना असो, अशा अनेक प्रकल्पांना जलद वेगाने पूर्ण करण्याचे काम सुरु आहे. मित्रांनो, जगात जिथे जिथे कोणत्याही उत्तम पद्धती, उत्कृष्ट सुविधा उपलब्ध आहेत, त्यांना आपल्या युवा मित्रांपर्यत, सव्वाशे कोटी भारतीयांपर्यत पोचवण्यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोट्यवधी जनतेच्या इच्छा-आकांक्षा, जनसहभागातूनच पूर्ण करणे हाच आमच्या विकासाचा मार्ग आहे, नवभारताच्या निर्मितीचा रस्ता आहे. उत्तरप्रदेशासाठी, देशातील जनतेसाठी तुम्ही सगळे जे करत आहात त्यासाठी मी मनापासून तुमचे अभिनंदन करतो.
एक दोन महिन्यांपूर्वी मी मुंबईला गेलो होतो, तेव्हा मुंबईतल्या उद्योगजगतातल्या लोकांना भेटायला बोलावले होते. तसे तर इतरही लोक उद्योजकांना बोलावतात, पण ते उघड सांगण्याची हिम्मत दाखवत नाही, मी बोलावले होते. त्यावेळी मी त्यांच्यासमोर एक सादरीकरण केले. की तुम्ही सगळे इतके श्रीमंत लोक आहात, इतके मोठमोठे उद्योग चालवता, आमच्या देशातील हे उद्योगविश्व खूप मोठे आहे, मात्र कृषीक्षेत्रात या उद्योगजगताची, कार्पोरेट क्षेत्राची गुंतवणूक केवळ एक टक्का आहे. जगात कुठेही इतकी कमी गुंतवणूक नाही. मी जवळपास अर्धा दिवस त्यांच्यासोबत घालवला. कॉर्पोरेट क्षेत्राची कृषी क्षेत्रातली गुंतवणूक कशी वाढेल, यावर आम्ही चर्चा-विचारविनिमय केला. एक टक्का गुंतवणूक तरी कशात आहे? ट्रैक्टर किंवा युरिया खताचे उत्पादन, याच्यातच. म्हणजे शेतकऱ्यांना या गुंतवणुकीचा थेट लाभ मिळतच नाही. त्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हायला हवा असा आग्रह मी धरला. विषय पण सांगितले. मूल्यवर्धन कसे होईल, कृषीक्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर कसा होईल, धान्याची गोदामे, शीतगृहे, पैकेजिंग असे कितीतरी विषय आहेत, जे कृषीउत्पादकांना मोठा लाभ मिळवून देऊ शकतात. आणि त्या दिशेने काम करण्याचा आग्रह केला आहे. मी त्यांना सूचना केली की तुम्ही या विषयांचा अभ्यास करण्यासाठी एक विचारवंत-अभ्यासकांचे पथक बनवा. कोणत्या क्षेत्रात काय काम करता येईल, हे ठरवा. देशाच्या कृषी क्षेत्रात आपण कॉर्पोरेट क्षेत्राची जितकी गुंतवणूक आणू शकू, तितकी आपल्या शेतकऱ्याची ताकद वाढेल. जसे आता, सूरीजी सांगत होते, आम्ही आता आमच्या देशात उत्पादन होणाऱ्या फळांच्या पल्पपासून ज्यूस बनवून विकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. म्हणजे याचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. आणि जो हा ज्यूस घेईल, त्यालाही फायदा होईल. आणि शेतकऱ्यालाही!
सांगण्याचे तात्पर्य हे, की ग्रामीण जीवनाशी या उद्योगजगताची सांगड कशी घालावी? छोट्या-छोट्या गोष्टी ग्रामीण जीवनापर्यत कशा घेऊन जाव्यात? हे करणे आपल्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, आणि म्हणूनच मी त्यावर एवढा जोर देतो आहे, त्यासाठी मी सर्व घटकांशी चर्चा करतो आहे. आणि मला विश्वास आहे की त्याचे परिणाम नक्कीच मिळतील. मला हाही विश्वास आहे की आज ज्याप्रकारे ६० कोटी रुपयांचे प्रकल्प प्रत्यक्षात साकार होऊ लागले आहेत आणि इतरही प्रकल्प योगी आदित्यनाथ यांनी हाती घेतले आहेत, जसे त्यांनी मघाशी सांगितलं की ५० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. मला विश्वास आहे की विकासाची महत्वाची कामे आपण केली आहेत. या कामांसाठी तुमचे आणि तुमच्या संपूर्ण चमूचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन!
माझ्याकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. उत्तरप्रदेशाचा खासदार या नात्यानेही या राज्याचा विकास होत असल्याच्या बातम्या मला खूप समाधान देतात. माझी ती जबाबदारी आहे आणि उत्तरप्रदेशच्या लोकांचा माझ्यावर हक्कही आहे. त्यामुळे मी येथे दोनदा आलो, पाचदा आलो. १५ वेळा आलो, तरी मी तुमचाच आहे. मी येथे येत नाही, तर इथे तुमच्यासोबतच असतो.
खूप खूप धन्यवाद !!
B.Gokhale/S.Bedekar/R.Aghor /P.Kor
पांच महीने में ये दूसरी बार है जब उद्योग जगत से जुड़े साथियों के साथ मैं यहां लखनऊ में मिल रहा हूं।
— PMO India (@PMOIndia) July 29, 2018
इससे पहले फरवरी में यूपी इन्वेस्टर्स समिट के लिए भी आप आए थे।
मुझे प्रसन्नता है कि उस संकल्प को ज़मीन पर उतारने की कड़ी में आज बड़ा कदम उठ रहा है: PM
कुछ लोग इसे Ground Breaking सेरेमनी कह रहे हैं,
— PMO India (@PMOIndia) July 29, 2018
लेकिन मैं इसे Record Breaking सेरेमनी कहूंगा।
इतने कम समय में जिस प्रकार प्रक्रियाओं को तेज़ी से आगे बढ़ाया गया है,
पुराने तौर तरीकों को बदला गया है, ऐसा उत्तर प्रदेश में देखने को नहीं मिलता था: PM
मुझे खुशी है कि योगी जी के नेतृत्व में सरकार ने निवेशकों से संवाद बनाए रखा और
— PMO India (@PMOIndia) July 29, 2018
Intent को Investment में बदलने के लिए माहौल तैयार किया
Online MoU ट्रैकर हो या क्लीयरेंस के लिए निवेश मित्र जैसा डिजिटल प्लेटफॉर्म,
ये यूपी में बिजनेस के लिए बने अनुकूल वातावरण को दर्शाता है: PM
मैंने यूपी की 22 करोड़ जनता को वचन दिया था कि उनके प्यार को ब्याज़ समेत लौटाउंगा
— PMO India (@PMOIndia) July 29, 2018
यहां जो परियोजनाएं शुरु हो रही हैं वो उसी वचनबद्धता का हिस्सा हैं
ये प्रोजेक्ट्स उत्तर प्रदेश में आर्थिक और औद्योगिक असंतुलन को दूर करने में भी सहायक होंगे: PM
ये प्रोजेक्ट्स Digital India और Make in India को नया आयाम देने की दिशा में बहुत बड़े कदम सिद्ध होने वाले हैं
— PMO India (@PMOIndia) July 29, 2018
उत्तर प्रदेश में इंटरनेट सर्विस पहुंचाने के लिए फाईबर बिछाना हो या फिर
IT सेंटर स्थापित करना
डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर यूपी के विकास को नई गति, नई दिशा देने वाला है: PM
एक ऐसी व्यवस्था खड़ी करना चाहते हैं जहां किसी प्रकार के भेदभाव की गुंजाइश ना हो,
— PMO India (@PMOIndia) July 29, 2018
प्रक्रियाओं में गति भी दिखे और संवेदनशीलता भी,
ना अपना,
ना पराया,
ना छोटा,
ना बड़ा,
सबके साथ समान व्यवहार।
यानि कुल मिलाकर सबका साथ, सबका विकास: PM
आज देश दुनिया के लिए Mobile Manufacturing का हब बनता जा रहा है
— PMO India (@PMOIndia) July 29, 2018
इस Manufacturing Revolution की अगुवाई उत्तर प्रदेश कर रहा है
यूपी में 50 से अधिक मोबाइल फोन बनाने वाली फैक्ट्रियां काम कर रही हैं
दुनिया की सबसे बड़ी Manufacturing Unit की भी शुरुआत यहां हो चुकी है: PM
सरकार Holistic vision, Inclusive Action की अप्रोच पर काम कर रही है।
— PMO India (@PMOIndia) July 29, 2018
यहां मौजूद आप सभी को और तमाम निवेशकों को भरोसा दिलाना चाहता हूं कि अभी तो ये शुरुआत है।
आप राष्ट्र निर्माण की एक महत्वपूर्ण इकाई हैं और आपके संकल्प, देश के करोड़ों नौजवानों को सपनों से भी जुड़े हुए हैं: PM
बिजली के क्षेत्र में जो भी Reforms किए गए हैं, उनसे देश और देश के सामान्य जन के हज़ारों करोड़ रुपयों की बचत हुई है।
— PMO India (@PMOIndia) July 29, 2018
उदय योजना ने डिस्ट्रिब्यूशन कंपनियों को नई लाइफलाइन दी है।
उजाला के LED बल्ब लगाए गए उससे 3 वर्षों के दौरान बिजली के बिल में करीब 50,000 करोड़ की बचत हुई है: PM
देश के पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी कहते रहे हैं कि वो ऐसा भारत देखना चाहते हैं जो समृद्ध हो, सक्षम हो और संवेदनशील हो।
— PMO India (@PMOIndia) July 29, 2018
जहां गांव और शहरों के बीच खाई ना हो।
जहां केंद्र और राज्य में,
श्रम और पूंजी में,
प्रशासन और नागरिक में Gap ना हो: PM