पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2026
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. या अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या असून, जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना केली आहे.
यासोबतच, पंतप्रधानांनी ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’मधून मृतांच्या वारसाला 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
‘X’ या समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणतात,
“उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुर्घटनेतील जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
या दुःखद घटनेत जीव गमावलेल्यांच्या वारसांना पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल, तर जखमींना 50,000 रुपये देण्यात येतील: पंतप्रधान @narendramodi”
Deeply anguished by the loss of lives due to the mishap in Mirzapur, Uttar Pradesh. My heartfelt condolences to the bereaved families. Praying for the quick recovery of the injured.
An ex gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each of those who lost…
— PMO India (@PMOIndia) April 23, 2026
* * *
निलिमा चितळे/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com