Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशात लखीमपुर खिरी दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त


नवी दिल्‍ली, 18 मे 2026

 

उत्तर प्रदेशात लखीमपुर खिरी येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आप्तस्वकीय  गमावले त्यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करत जखमी झालेल्या व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात अशी कामना पंतप्रधानांनी केली आहे.

या घटनेतल्या मृतांच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ) 2 लाख रुपये मदत दिली जाणार असून प्रत्येक जखमी व्यक्तीला मदत म्हणून 50,000 रुपये देण्यात येणार असल्याचे  पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले आहे. 

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:

“उत्तर प्रदेशात लखीमपुर खिरी येथे झालेल्या दुर्घटनेमुळे अत्यंत व्यथित झालो आहे. या घटनेत ज्यांनी जीव गमावला त्यांच्या प्रियजनांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या तब्बेतीत  लवकर सुधारणा व्हावी ही सदिच्छा.

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकाला  पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची मदत देण्यात येईल. प्रत्येक जखमी व्यक्तीला 50,000 रुपये देण्यात येतील: पंतप्रधान @narendramodi”

 

* * *

निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai