Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्पन्नावरील कर चुकवेगिरी आणि दुहेरी करआकारणी रोखण्यासाठी भारत आणि किरगिझ दरम्यान करारात सुधारणा करणाऱ्या प्रोटोकॉलला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्पन्नावरील कर चुकवेगिरी आणि दुहेरी करआकारणी रोखण्यासाठी भारत आणि किरगिझ दरम्यान करारात सुधारणा करणाऱ्या प्रोटोकॉलला मंजुरी दिली आहे.

दुहेरी करआकारणी टाळण्यासंदर्भातील करारात दुरुस्ती करणाऱ्या प्रोटोकॉलचे उद्दिष्ट अनुच्छेद 26 (माहितीचे आदान-प्रदान) आंतरराष्ट्रीय मानकानुसार अद्ययावत करणे हा आहे. अद्ययावत अनुच्छेद माहितीच्या अधिकाधिक आदान-प्रदानाची तरतूद करतो. कराराच्या सध्याच्या अनुच्छेद 26 मध्ये नव्याने जोडण्यात आलेले परिच्छेद  4 आणि  5 मध्ये तरतूद आहे की या अनुच्छेद अंतर्गत ज्या देशाकडे माहिती मागितली जाते तो देश त्या माहितीत त्याचे काही हित नाही म्हणून किंवा बँक अथवा वित्त संस्थेची आहे म्हणून ती द्यायला नकार देऊ शकणार नाही. या प्रोटोकॉलमुळे भारताला या करारांतर्गत मिळालेल्या माहितीचा वापर इतर कायदेशीर अंमलबजावणी उद्देशासाठी करता येऊ शकेल.

 

N.Sapre/S.Kane/D.Rane