Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ऊर्जा कार्यक्षमता सेवा क्षेत्रात भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


ऊर्जा व्यवस्थापन आणि जतन क्षेत्रात विविध सेवा पुरवण्यासाठी राष्ट्रीय उत्पादकता परिषद, ही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत येणारी परिषद आणि संयुक्त अरब अमिरात मधल्या अल इतिहाद एनर्जी सर्व्हिसेस यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला, केंद्रीय मंत्रिमंडळाने, पूर्वलक्षी प्रभावाने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या सामंजस्य करारांतर्गत राष्ट्रीय उत्पादकता परिषद, ऊर्जा लेखा परीक्षकांचे प्रशिक्षण, मागणी व्यवस्थापन, या सेवा पुरवणार आहे तर अल इतिहाद, संयुक्त अरब अमिरातीतल्या ऊर्जा परीक्षकाच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक ती सर्व स्थानिक मदत, उद्योगांचे मागणी विषयक व्यवस्थापन या सेवा, संबंधित उद्योगांना पुरवणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha