Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

एकता, परस्पर सहकार्य आणि सामूहिक निर्धार यांच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी सामायिक केले आहे .


जेव्हा नागरिक एकता आणि परस्पर सहकार्याच्या धाग्यांनी बांधले जातात, तेव्हा राष्ट्राची शक्ती अनेक पटींनी वाढते,अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  सामायिक केले आहे. भारतातील लोकांच्या याच सामूहिक निर्धाराच्या जोरावर देश प्रगतीची नवनवीन शिखरे सातत्याने गाठत आहे,असे ही  मोदी यांनी अधोरेखित केले आहे.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“जेव्हा नागरिक एकता आणि परस्पर सहकार्याच्या धाग्यांनी बांधले जातात, तेव्हा राष्ट्राची शक्ती अनेक पटींनी वाढते. भारतातील लोकांच्या याच सामूहिक निर्धाराच्या जोरावर देश प्रगतीची नवनवीन शिखरे सातत्याने गाठत आहे. “

धूमायन्ते व्यपेतानि ज्वलन्ति सहितानि च।
धृतराष्ट्रोल्मुकानीव ज्ञातयो भरतर्षभ॥”

या सुभाषिताचा अर्थ असा आहे, ज्याप्रमाणे लाकडाचे तुकडे वेगळे असताना त्यांची शक्ती पूर्णपणे दाखवू शकत होत नाही; परंतु ते एकत्र आले की तेजस्वीपणे प्रज्वलित होतात आणि प्रकाश व उष्णता निर्माण करतात, त्याचप्रमाणे एखाद्या राष्ट्राची प्रगती, समृद्धी आणि सामर्थ्य हे तेथील नागरिकांच्या एकता, परस्पर सहकार्य आणि सामूहिक दृढनिश्चयावर अवलंबून असते.

***

NehaKulkarni / SampadaPatgaonkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai