नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत आज वाहतूक आणि लॉजिस्टिक्सच्या व्यापक क्षेत्रांतर्गत संशोधन, नियोजन, मूल्यांकन, देखरेख आणि प्रभाव मूल्यांकन अधिक मजबूत करण्यासाठी एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण (आयटीएलए) नावाच्या विशेष हेतू संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली.
विविध वाहतूक-संबंधित मंत्रालये आणि संस्थांमधील विखंडित नियोजन आणि अंमलबजावणीमुळे निर्माण होणाऱ्या दीर्घकालीन आव्हानांना सामोरे जाण्याचा या मंजुरीचा उद्देश आहे. एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स प्राधिकरण अधिक समन्वय आणि बहु-मार्गी एकात्मतेला चालना देऊन, भारतातील वाहतूक संबंधी पायाभूत सुविधांच्या विकासाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि परिणामकारकता वाढवेल अशी अपेक्षा आहे.
आयटीएलए ची प्रमुख भूमिका आणि जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असतील:
आयटीएलएची स्थापना मल्टिमोडल वाहतूक व्यवस्था मजबूत करून, पायाभूत सुविधांची कार्यक्षमता सुधारून, लॉजिस्टिक्स खर्च कमी करून आणि भारताची जागतिक लॉजिस्टिक्स स्पर्धात्मकता वाढवून भारताचे व्हिजन 2047 साकारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. आयटीएलए संशोधन, नियोजन, बिग डेटा एकत्रीकरण, प्रकल्प देखरेख आणि मूल्यमापन यासाठी संस्थात्मक क्षमता निर्माण करेल, तसेच क्षमता बांधणी आणि आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देईल.
निलिमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
The Cabinet has approved the setting up of the Integrated Transport & Logistics Authority (ITLA) to bring greater coordination, data-led planning and multimodal integration across India’s transport ecosystem. This will have a wide-ranging impact on our growth trajectory. https://t.co/6jvuQD8k9g
— Narendra Modi (@narendramodi) October 6, 2026