पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढील प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.
1. खालील पद्धतीने फर्टिलायझर्स एन्ड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (एफएसीटी) ची 481.79 एकर जमीन केरळ सरकारला विकणे:
· एक कोटी रुपये प्रति एकर दराने 150 एकर जमीन (त्या बदल्यात केरळ सरकार एफएसीटीला 143.22 एकर भूमिजमिनीचे संपूर्ण स्वामित्व अधिकार द्यायला सहमत) आणि
· एर्नाकुलमच्या जिल्हाधिकाऱ्याद्वारे निर्धारित 2.4758 कोटी रुपये प्रति एकर दराने उर्वरित 331.79 एकर जमीन
2. विक्रीतून मिळालेल्या निधीचा उपयोग एफएसीटी द्वारे निधीची टंचाई दूर करण्मासासाठी , ताळेबंद सुधारण्यासाठी केला जाईल आणि कंपनीच्या शाश्वत विकासासाठी क्षमता विस्तार प्रकल्प राबवून कंपनीच्या भौतिक आणि वित्तीय कामगिरी सुधारण्यासाठी केला जाईल.
प्रमुख प्रभाव :
या मंजुरीमुळे एफएसीटीला बैंक कर्ज कमी करण्यात आणि खतांची उत्पादन क्षमता वाढवण्यात , लॉजिस्टिक/ कच्चा माल सुविधा सुधारण्यासाठी प्रकल्प राबवण्यात मदत मिळेल.
लाभ :
एफएसीटीचे पुनरूजीवन केल्यामुळे कंपनी विस्तार आणि विविधतेच्या संधी उपलब्ध होतील. यामुळे केरळच्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळेल. आणि दक्षिण भारतासाठी खत उपलब्धता सुधारेल. खत आणि रसायनावरील आयतीवरील अवलंबत्व कमी होईल. त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यात बचत होईल.
**********
S.Tupe/S.Kane/P.Malandkar