पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 7 मे 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त सशस्त्र दलांच्या शौर्य, अचूकता आणि दृढनिश्चयाला सलाम केला.
पहलगाम येथे निष्पाप भारतीयांवर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्यांना सशस्त्र दलांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचे पंतप्रधान म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधात भारताच्या ठाम भूमिकेचे आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्याच्या भारताच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतिक आहे, असेही ते म्हणाले.
या ऑपरेशनने सशस्त्र दलांची व्यावसायिकता, सज्जता आणि समन्वित शक्ती अधोरेखित केली, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या ऑपरेशनने दलांमधील वाढती एकजूट दर्शवली आणि संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या भारताच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला मिळालेली ताकद अधोरेखित केली, हे त्यांनी अधोरेखित केले.
दहशतवादाचा पराभव करण्याच्या आणि त्याला पोषक ठरणारी परिसंस्था नष्ट करण्याच्या आपल्या निर्धारावर भारत ठाम असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान सशस्त्र दलांनी आपले शौर्य दाखवून भारतीय नागरिकांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर दिले, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक भारतीयाला आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरमधील यश आणि सशस्त्र दलांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी, नागरिकांनी एक्स (X), फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या समाज माध्यमावरील आपले डिस्प्ले पिक्चर बदलून त्यांनी सामायिक केलेले छायाचित्र लावावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले;
“एक वर्षापूर्वी, आपल्या सशस्त्र दलांनी #OperationSindoor दरम्यान अतुलनीय शौर्य, अचूकता आणि दृढनिश्चय दाखवला. पहलगाम येथे निष्पाप भारतीयांवर हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्यांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. संपूर्ण देश आपल्या दलांच्या शौर्याला सलाम करतो.
ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाविरोधात भारताच्या ठाम भूमिका आणि राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्याची अढळ वचनबद्धता दर्शवली. यातून आपल्या सशस्त्र दलांची व्यावसायिकता, सज्जता आणि समन्वित शक्ती देखील अधोरेखित झाली. त्याच वेळी, यातून आपल्या दलांमधील वाढती एकजूट देखील दाखवली तसेच संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या भारताच्या प्रयत्नांनी आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला मिळालेली ताकद अधोरेखित केली.
आज, एक वर्षानंतरही, दहशतवादाचा पराभव करण्याच्या आणि त्याला पोषक ठरणारी परिसंस्था नष्ट करण्याच्या आमच्या निर्धारावर आम्ही पूर्वीप्रमाणेच ठाम आहोत”.
A year ago, our armed forces displayed unparalleled courage, precision and resolve during #OperationSindoor. They gave a fitting response to those who dared to attack innocent Indians at Pahalgam. The entire nation salutes our forces for their valour.
Operation Sindoor reflected…
— Narendra Modi (@narendramodi) May 7, 2026
“एक वर्षापूर्वी, #OperationSindoor दरम्यान, आपल्या सशस्त्र दलांनी शौर्य दाखवून आपल्या देशबांधवांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर प्रत्युत्तर दिले. प्रत्येक भारतीयाला आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. आपल्या दलांप्रति आणि #OperationSindoor च्या यशाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी, चला आपण सर्वजण एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसह आपल्या सोशल मीडियावरील डिस्प्ले पिक्चर्स खाली दिलेल्या चित्राने बदलूया.”
A year ago, during #OperationSindoor, our armed forces showcased their valour and gave a firm response to those who attacked our people. Every Indian is proud of our armed forces. As a mark of respect to our forces and their success during #OperationSindoor, let us all change our… pic.twitter.com/w4A3j1bGTw
— Narendra Modi (@narendramodi) May 7, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com