पीएम्इंडिया
ओरॅकलच्या जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी साफ्रा कार्ट्ज यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
बंगळुरु येथे अद्ययावत संकुल उभारण्याच्या आणि भारतातील 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना ओरॅकल अकादमीच्या माध्यमातून कॉम्प्युटर सायन्सचे कौशल्य विकसित करायला मदत करण्याच्या उपक्रमासंबंधीच्या ओरॅकलच्या योजनांची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली.
या योजनांमुळे नरेंद्र मोदी यांच्या “मेक इन इंडिया” अभियानाला चालना मिळेल आणि जागतिक दर्जाचे संरचना आणि निर्मिती केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट होईल असे ओरॅकलचे मत आहे.
या उपक्रमाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
S.Kane/S.Tupe/M.Desai