पीएम्इंडिया
कार्मिक व्यवस्थापन आणि सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत आणि सिंगापूर यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
वैशिष्ट्ये:
मनुष्य बळ,कामाची ठिकाणे आणि रोजगार, सार्वजनिक सेवा प्रदान, मनुष्य बळ व्यवस्थापन, सार्वजनिक क्षेत्रातल्या सुधारणा, नेतृत्व आणि प्रतिभा विकास, ई प्रशासन, डिजिटल शासन इत्यादीसह सध्याच्या प्रशासन व्यवस्थेत अधिक सुधारणा घडवून आणण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.
लाभ:
या सामंजस्य करारामुळे, सार्वजनिक प्रशासन आणि प्रशासन सुधारणा या क्षेत्रात भारत आणि सिंगापूर यांच्यातल्या सहकार्याला चौकट प्राप्त होणार आहे. सार्वजनिक प्रशासन,सार्वजनिक सेवा सुधारणा आणि सुप्रशासन यामध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्याचा या मागचा उद्देश आहे परिणामी सार्वजनिक दायित्वाला अधिक प्रोत्साहन मिळणार आहे.
ऑनलाईन सार्वजनिक सेवा प्रदान करण्यात सुधारणा व्हावी या हेतूने सार्वजनिक व्यवस्थापनात कल्पक उत्तम प्रथा उपयोगात आणण्याचाही या सामंजस्य कराराचा उद्देश आहे.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane