Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कृषी आणि संलग्न क्षेत्रातील सहकार्यासाठी तैवान बरोबरच्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि संलग्न क्षेत्रातील सहकार्यासाठी भारतातील तैपेई आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आणि तैपेईमधील भारत तैपेई संघटना यांच्यातील सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली.

या कराराअंतर्गत, कृषी, बागायती, पशुपालन, मत्स्योद्योग, जलसंस्कृती आणि अन्नप्रक्रिया, जनुकीय संसाधने तसेच पर्यावरणीय शाश्वती या क्षेत्रांमध्ये सहकार्य पुरवले जाईल. या क्षेत्रांमधील सहकार्यासाठी दोन्ही देश आपापल्या देशातील खासगी क्षेत्राला प्रोत्साहित करतील. उभय देशांमधील सहकार्यामध्ये दौरे, माहिती आणि तंत्रज्ञानाचे आदान प्रदान, प्रशिक्षण आणि व्यापारातील अडथळे दूर करुन कृषी व्यापाराचा विस्तार यांचा समावेश आहे.

या सामंजस्य कराराअंतर्गत, परस्पर हिताची प्राधान्य क्षेत्रे निवडण्यासाठी एक संयुक्त कृती समिती स्थापन केली जाईल, जी अनेक उपक्रमांच्या प्रगतीचा पाठपुरावा करेल. सुरुवातीला पाच वर्षांसाठी सामंजस्य करार केला जाईल आणि दोन्ही देशांची इच्छा असल्यास आणखी पाच वर्षांसाठी त्याचे आपोआप नुतनीकरण केले जाईल.

S. Kane / B. Gokhale