पीएम्इंडिया
कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्यासाठी भारत आणि इराण यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मंजुरी दिली आहे.इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान 17 फेब्रुवारी 2018 ला या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
पिके,कृषी विस्तार, बागायत ,यंत्र सामग्री,कापणी नंतरचे तंत्रज्ञान,पत,सहकार्य या क्षेत्रात या कराराद्वारे सहकार्य करण्यात येणार आहे.याशिवाय मृदा संवर्धन आणि जल व्यवस्थापन, एकात्मिक पोषण व्यवस्थापन,बियाणे तंत्रज्ञान आणि विपणन या क्षेत्रातही या कराराद्वारे सहकार्य करण्यात येईल.पशुधन सुधारणा,दुग्ध विकास,पशु आरोग्य आणि सामंजस्य कराराच्या कक्षेत येणाऱ्या आणि परस्पर संमतीच्या इतर क्षेत्राचाही यात समावेश आहे. तज्ञाचे आदान प्रदान, साहित्य आणि माहिती,प्रशिक्षणार्थी आणि वैज्ञानिकांचे अभ्यास दौरे आणि प्रशिक्षण कार्यक्रम यांची देवाण घेवाण, उपयुक्त परिषद आणि कार्यशाळा यांचे आयोजन तसेच परस्पर सहमतीने मान्य झालेल्या मुद्द्यांवरही सहकार्य करण्यात येईल.
सामंजस्य कराराची पूर्तता करण्यासाठी देखरेख ठेवण्यासाठी संयुक्त कृती गटाची स्थापना करण्यात येईल.हा गट दर दोन वर्षाआड भारतात आणि इराण मध्ये आळीपाळीने बैठका घेईल. पाच वर्षासाठी हा सामंजस्य करार राहणार असून एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला हा करार संपुष्टात आणण्यासाठी नोटीस दिली नाही तर पुढच्या पाच वर्षासाठी हा करार आपोआप लागू राहणार आहे.
BG/NC