Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कॅनडाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मार्क कार्नी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मार्क कार्नी यांचे कॅनडाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल तसेच लिबरल पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.भारत आणि कॅनडा दरम्यानची सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याच्या राज्याप्रति असलेली अतूट वचनबद्धता आणि एकमेकांना घट्ट जोडून ठेवणारे दोन्ही देशांच्या नागरिकांमधील घनिष्ट संबंध त्यांनी अधोरेखित केले.  

एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे:

कॅनडाच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल @MarkJCarney आणि लिबरल पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल अभिनंदन. भारत आणि कॅनडा सामायिक लोकशाही मूल्ये, कायद्याच्या राज्याप्रति दृढ बांधिलकी आणि परस्परांच्या नागरिकांमधील दृढ संबंधांनी बांधलेले आहेत. आपली भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि आपल्या नागरिकांना अधिक संधी मिळवून देण्यासाठी मी आपल्याबरोबर काम करायला उत्सुक आहे.”

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai