Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कॅनडातल्या संसदीय निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जस्टीन त्रुदाँ यांचं अभिनंदन केलं


कॅनडातल्या संसदीय निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जस्टीन त्रुदाँ यांचं अभिनंदन केलं आहे.

कॅनडातल्या संसदीय निवडणुकीतल्या यशाबद्दल जस्टीन त्रुदाँ यांचं अभिनंदन. कॅनडाबरोबरच्या दृढ संबंधांना आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो. लोकशाही आणि भारतीय वंशांच्या लोकांमुळे अधिक वृध्दींगत झालेली समृध्द सर्वंकषता हा दोन्ही देशातील महत्त्वपूर्ण दुवा आहे.

एप्रिल 2015 मधल्या माझ्या कॅनडा भेटीच्या आणि तुमच्याबरोबर झालेल्या चर्चेच्या अनेक सुखद आठवणी आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

J.Patankar/S.Tupe/N.Sapre