Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांसाठी महागाई दिलासा म्हणून अतिरिक्त हप्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; 01.01.2026 पासून अंमलात येणार


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भाववाढीची भरपाई करण्यासाठी, मूळ वेतन/पेन्शनच्या सध्याच्या 58% दरामध्ये 2% वाढ करून, केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 01.01.2026 पासून महागाई भत्त्याचा (DA) आणि महागाई दिलाशाचा (DR) अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंजुरी दिली आहे.

महागाई भत्ता आणि महागाई दिलासा या दोन्हीतील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी एकूण 6791.24 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. याचा फायदा सुमारे 50.46 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 68.27 लाख पेन्शनधारकांना होईल.

ही वाढ सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित स्वीकारलेल्या सूत्रानुसार करण्यात आली आहे.

***

माधुरी पांगे/ शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai