पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी विद्यापीठ कायदा 1992 च्या संबंधित कलमात सुधारणा करायला मान्यता दिली ज्यामुळे केंद्रीय कृषी विद्यापीठ इंफाळच्या कार्यकक्षेत नागालँडचा समावेश होणार आहे. यामुळे इंफाळ येथील पशुवैद्यक विज्ञान महाविद्यालयातून पशूपालन क्षेत्रासाठी आवश्यक व्यावसायिक मनुष्यबळ निर्मितीसाठी मदत होणार आहे. यामुळे या भागातल्या आर्थिक-सामाजिक क्षेत्राच्या विकासाला मदत होणार आहे.
MD/ST/NC/AK