पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा 2017, अस्तित्वात आल्यानंतर (जम्मू आणि काश्मीरपर्यंत विस्तारित ) यासंबंधीचे दुरुस्ती विधेयक, 2017 पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी मान्यता देण्यात आली. हे नवीन दुरुस्ती विधेयक आता पूर्वीच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायद्याची जागा घेणार आहे.
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या विस्तारकक्षेत आता जम्मू आणि काश्मीर राज्याचाही अंतर्भाव करण्यात आला आहे.
या कायद्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने 8 जुलै, 2017 पासून होणार असून प्रस्तुत दुरुस्ती विधेयक संसदेच्या चालू सत्रामध्ये मांडण्यात येणार आहे.
N.Sapre/S.Bedekar/Anagha