पीएम्इंडिया
केंद्र पुरस्कृत योजनांच्या सुसूत्रीकरणाबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या उपगटाच्या वतीनं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपगटाचा अंतिम अहवाल सादर केला. अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, मणीपूर, राजस्थान, तेलंगणचे मुख्यमंत्री तसंच अंदमान-निकोबार बेटाचे नायब राज्यपाल यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या परिश्रमांची पंतप्रधानांनी यावेळी प्रशंसा केली. मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, केरळ, मणीपूर, नागालॅण्ड, राजस्थान, तेलंगण, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अंदमान निकोबार बेटाचे नायब राज्यपाल यांचा उपगटात समावेश आहे.
N. Chitale/S.Tupe/N.Sapre
A delegation of State CMs presented Report of the Sub-Group of CMs on Rationalization of Centrally Sponsored Schemes pic.twitter.com/e7bygXF8H0
— Narendra Modi (@narendramodi) October 27, 2015
I congratulate the CMs who came together & worked on the report on Rationalization of Centrally Sponsored Schemes. https://t.co/MIbwTJGTYb
— NarendraModi(@narendramodi) October 27, 2015