Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमधल्या जनतेला पंतप्रधानांचा संदेश


गुजरातच्या माझ्या बंधु-भगिनींनो,

महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्या भूमीवर कालपासून जसे वातावरण निर्माण होत आहे, हिंसेचा ज्या पध्दतीने हत्यार म्हणून वापर केला जातोय… हिंसाचाराने काही साध्य होत नाही हे आपण सर्व जाणतोच.

आपण सर्वांनी एकत्र वाटचाल केली, एकोपा ठेवला तरच राज्याचा विकास शक्य आहे यावर आपला सदैव विश्वास राहिला आहे.

सर्व बंधू-भगिनींना माझे आवाहन आहे की या घडीला आपला एकच मंत्र हवा तो म्हणजे “शांतता”. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मुद्दा चर्चेद्वारे सोडविला जाऊ शकतो. आपण सर्वांनी लोकशाही तत्त्वाचे पालन केले पाहिजे. गुजरातला नव्या उंचीवर नेण्यासाठीच्या प्रयत्नात आपण सर्वांनी योगदान दयावे आणि चर्चेद्वारे समस्या सोडविण्यासाठी एकत्रित यावे, अशी माझी गुजरातच्या सर्व बंधू-भगिनींना विनम्र विनंती आहे.