Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ग्रामीण भागात पायाभूत सोयी देण्यासाठी विद्यमान भूसंपादन कायद्यात दुरुस्त्या आवश्यक-पंतप्रधान सिंगाजी औष्णिक विद्युत प्रकल्प राष्ट्राला अर्पण


s2015030562795 [ PM India 265KB ]

s2015030562796 [ PM India 249KB ]

s2015030562798 [ PM India 216KB ]

s2015030562799 [ PM India 230KB ]

s2015030562794 [ PM India 0KB ]

ग्रामीण भागात रस्ते, गरीबांसाठी घरे, शाळा, रुग्णालये व सिंचन प्रकल्प अशा पायाभूत सोयी देण्यासाठी विद्यमान भूसंपादन कायद्यात दुरुस्त्या करणे आवश्यक आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील खांडवा येथे शेतकरी मेळाव्यात सांगितले.

श्री सिंगाजी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा पहिला टप्पा (2X600 मेगावॅट) राष्ट्राला अर्पण करण्याचा आणि दुसऱ्या टप्प्याचा (2X600 मेगावॅट) शीलान्यास समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला त्यावेळी तेथील ग्रामीण भागातील जनता व शेतकरी यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात मोदी अत्यंत तळमळीने भूसंपादन दुरुस्त्या आवश्यकता पटवून दिली.

होळी सण जवळ आला असूनही या मेळाव्याला ग्रामीण जनता उत्साहाने उपस्थित राहिली यावरुन लोकांची विकासाप्रती बांधिलकी दिसून येते असे मोदी म्हणाले.

ऊर्जा हा विकासाचा महत्त्वाचा घटक असून सर्वांना वीज पुरविण्याचे व्रत आम्ही घेतले आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, नवे सरकार आल्यानंतर गेल्या 9 ते 10 महिन्यात देशातील वीज निर्मिती 11 टक्क्याने वाढली आहे.

ऊर्जा बचत करणे हे सुध्दा महत्त्वाचे आहे त्यासाठी सरकारने घरोघरी व रस्त्यांवर एलईडी दिवे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे, अशी माहितीही मोदी यांनी दिली. आमचे सरकार भ्रष्टाचार रोखण्यासाठी कार्य करीत असून कोळसा खाणीचे यशस्वी झालेले लिलाव हे त्याचे एक उदाहरण आहे. त्‍यामुळे मध्य प्रदेशाला खूप फायदा होईल असेही मोदी यांनी सांगितले.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान व केंद्रीय वीज राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) पियूष गोयल हे सुध्दा यावेळी उपस्थित होते.