पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण विकास मंत्रालयाच्या पी एम आर डी एफ अर्थात पंतप्रधान ग्रामीण विकास मित्र योजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रात काम करत असलेल्या 230 हून अधिक युवकांशी आज संवाद साधला.
या भेटीदरम्यान अकरा युवकांनी दुर्गम, ग्रामीण, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात विविध विषयांवर करत असलेल्या आपल्या कार्याबद्दल माहिती दिली. यामध्ये महिला सक्षमीकरण, माता आणि बाल आरोग्य, शिक्षण, पोषण, उपजिवीका, स्वच्छ भारत, एक भारत-श्रेष्ठ भारत यासारख्या विषयांचा समावेश आहे.
यानंतर पंतप्रधानांबरोबर झालेल्या चर्चासत्रादरम्यान अनेक युवकांनी ईशान्येकडील क्षेत्राचा विकास, ग्रामीण शिक्षण, आदिवासी विकास, सेंद्रीय शेती आणि अपंगांचे कल्याण यासंदर्भातील विषयांवरील आपले विचार व्यक्त केले. यावेळी पंतप्रधानांनी या सर्व मित्रांना लिहिलेल्या एका पत्राची आठवण करुन दिली, या पत्राद्वारे पंतप्रधानांनी “नरेंद्र मोदी ॲप” बद्दल त्यांची प्रतिक्रिया मागवली होती. मोठ्या प्रमाणावर प्राप्त झालेल्या प्रतिक्रियांबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले. या प्रतिक्रियांमध्ये एकाही तक्रारीचा समावेश नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आजचे सादरीकरण आणि प्राप्त झालेल्या प्रतिक्रियांवरुन “जनतेचा सहभाग” अशी संकल्पना उद्याला येत असल्याचे मोदी म्हणाले. परिवर्तन आणण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक महत्वपूर्ण पैलू असल्याचे त्यांनी नमूद केले.
कुटुंबाच्या दबावाला झुगारुन ग्रामीण आणि दुर्गम क्षेत्रातील युवकांच्या समर्पित वृत्तीबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.
“एम पी आर डी एफ” उपक्रमाला अधिक चांगले बनवण्यासाठी पंतप्रधानांनी सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे.
याप्रसंगी पंतप्रधानांनी “स्क्रिप्टिंग चेंज” या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात देशभरातील पीएमआरडी फेलोंकडून केल्या जात असलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे.
यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग उपस्थित होते.
S.Tupe/ I.Jhala/ M.Desai
Extensive interaction with PM Rural Development Fellows. Heard novel experiences on agriculture, rural development, education & other issues
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2016
Our belief in people's participation is firm. It is our Jan Shakti that will take India to new heights of progress. https://t.co/fBy7ScQ1V8
— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2016